वीज माफीसाठी शिवसेना आमदारांच्या घरापुढे ‘आप’चा ठिय्या, सत्ताधाऱ्यांनो आठवा आश्वासन!

akola news Sit in front of Shiv Sena MLAs house for power amnesty, eighth assurance from the ruling party!
akola news Sit in front of Shiv Sena MLAs house for power amnesty, eighth assurance from the ruling party!

अकोला  ः कोरोना संकटात जेथे दोन वेळच्या जेवणाची भांत नाही, तिथे हजारो रुपयांचे वीज देयके कशी भरावी? निवडणुकीच्या काळात ३०० युनिटपर्यंत वीज माफीचे आश्वासन दिले होते, त्याचे झाले काय? ३० टक्के वीज दर कपात कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या घरापुढे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी लॉकडाउन असतानाही ठिय्या आंदोलन केले.

सत्ताधाऱ्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देणे हा या आंदोलना मागिल उद्देश होता.


कोरोना संकट काळात अनेकांचा रोजगार हिरावला गेला. दोन वेळ जेवणाची सोय लावतानाही अनेक कुटुंबाची फरपट होत आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांचा विसर पाडत कोरोना काळातील तीन महिन्यांचे अव्वाच्या सव्वा बिले ग्राहकांच्या माथी मारले आहे.

ज्यांची दोनवेळ जेवणाची सोय नाही, ते हजारो रुपयांची वीज देयके कशी भरणार? त्यांना वीज देयक माफ करण्यासंदर्भात शासनाकडून कोणतीच उपाययोजना का केली जात नाही, असे प्रश्न उपस्थित करीत आम आदमी पार्टीने राज्यभर आंदोलने उभारली आहेत.

रविवारी सत्ताधारी पक्ष शिवसेनेच्या आमदारांच्या घरापुढे ठिय्या देवून आणि आमदारांचा घेराव घालून त्यांना त्यांच्या पक्षाने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. ३०० युनिटपर्यंतची वीज माफी, ३० टक्के वीज दरकपात, वीज वहन व वीज आकार रद्द करण्याच्या आवश्वासनाची सत्ताधाऱ्यांनी पूर्ती करावी, या मागणीसाठी ठिय्या देण्यात आला.

त्यासोबतच कोरोना काळातील २०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्यात यावे आणि ज्यांनी वीज देयके भरली आहेत, त्यांचे पुढच्या देयकात समायोजन करण्यात यावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

या आंदोलनात आपचे अमरावती विभागीय संयोजक शेख अन्सार, महानगर सहसंयोजक संदीप जोशी, संघटक ठाकूरदास चौधरी, सचिव गजानन गणवीर, सहसचिव अलिम मिर्झा, प्रभारी जिल्हा संयोजक अरविंद कांबळे, काझी लायक अली, अ. रफिक आदींनी सहभाग घेतला होता.
 
मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा आमचे म्हणणे !
कोरोना संकट काळातील वीज माफी आणि निवडणुकीच्या काळात शिवसेनेने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना रविवारी सोपविले. आपण सर्वसामान्यांवर पडलेला वीज देयकांचा भार कमी करण्यासाठी आमचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, अशी विनंती आंदोलकांनी आमदारांना केली.
 
आंदोलन स्थळी पोलिस
शहरात रविवारी एक दिवसाचा लॉकडाउन असताना शिवसेना आमदार गाेपीकिशन बाजाेरीया, आमदार विल्पव बाजाेरीया यांच्या निवास स्थान परिसरात ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी पाेलिसांनी आंदोलन स्थळी धाव घेत, आंदोलकांची माहिती घेतली. त्यांची नावे लिहून घेतलीत.
  
‘आप’ने केलेल्या मागण्या
- काेवीड-१९दरम्यान चार महिन्यांचे २०० युनीट वीज माफ करा.
- शिवसेनेने निवडणुकीपूर्वी ३०० युनिटपर्यंतचे दर ३० टक्के कमी करण्यात येतील, असे आवश्यक दिले हाेते. या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी.
- १ एप्रिलपासून केलेली वज दरवाढ रद्द करण्यात यावी.
- वीज देयकातील वहन आकार, वीज आकार रद्द करण्यात यावा.
- वीज कंपन्यांचे सीएजी ऑडिट करण्यात यावे.
- टाळेबंदी काळात वीज देयक भरलेल्या ग्राहकांचे देयक पुढील देयकातून वजा करण्यात यावे.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com