एकाच रात्रीत झाले होत्‍याचे नव्‍हते; भीषण आगीत सहा दुकाने जळून खाक

Akola News Six shops burnt down in Malkapur fire
Akola News Six shops burnt down in Malkapur fire

मलकापूर (जि.बुलडाणा) : शहरातील गजानन टॉकीज रोडवरील राधाकिसन चाळच्या बाजूला असलेल्या सहा दुकानांना (ता.२८) रात्रीच्या वेळी अचानक आग लागल्याची घटना घडली असून या आगीचे स्वरूप एवढे भयंकर होते की आगीचे लोट  प्रचंड प्रमाणात निघत होते.

या आगीत सहाही दुकाने जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच नगर पालिकेचे अग्नीशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. लॉकडाउनमुळे आधीच व्‍यवसायात मंदी आली असून आगीमुळे दुकानातील लाखोंचे साहित्‍य जळून खाक झाल्‍याने दुकान मालक हतबल झाले आहेत.

  याबाबत प्राप्‍त माहितीनुसार, गजानन टॉकीज रोडवरील मुख्य रस्त्यावर असलेल्या सत रमेती राम टोबॅको, सुरजमल अ‍ॅण्ड कंपनी, गांधी बुक डेपो, हारूण अजीज यांच्या दुकान व गोडाऊनला  (ता.२८) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीने बघता बघता एवढे रौद्ररूप धारण केले की, आगीचे लोळ प्रचंड प्रमाणात निघत होते. आगीची तीव्रता बघता सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या आगीत सहाही दुकाने जळून खाक झाली असून लाखो रूपयांचे नुकसान झाले. तर याच दुकानांच्या बाजूला असलेल्या अग्रवाल स्टोअर्स व हिरालाल दिपचंद अग्रवाल यांच्याही दुकानांचे सुध्दा मोठे नुकसान झाले आहे. या आगीत वह्या, पुस्तके, स्टेशनरी, कटलरी, प्रिंटींग प्रेसचे साहित्य, मशनरी, संगणक, पुस्तके, कागद, धान्य, तंबाखू यासह आदी साहित्य जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले.

आगीबाबत न.प.पाणी पुरवठा सभापती अनिल गांधी यांना माहिती मिळताच त्यांनी अग्नीशमन दलाचे कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांना माहिती दिली असता न.प.चे अग्नीशमन दल, विरसिंह नरसीभाई दंड, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्नीशमन गाड्यांसह वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत अग्नीशमन दलाचे वासुदेव भोपळे, सुरजसिंह राजपूत, दिपकसिंग राजपूत, निलेश चोपडे, शुभम राजपूत तसेच मलकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पो.निरीक्षक ठाकरे, ए.एस.आय दिपक चंद्रशेखर, पोलीस कर्मचारी शैलेश सोनोने, अनिल डागोर, सलिम बर्डे, मिलिंद ताकतोडे व वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अथक परिश्रमातून या आगीवर नियंत्रण मिळविले.

आग लागलेल्या दुकानांच्या लाईनमध्येच अनेक मोठी दुकाने असून ही आग वेळीच आटोक्यात आली नसती तर याहीपेक्षा मोठा अनर्थ घडला असता.
आगीची माहिती मिळताच भाराकाँ शहराध्यक्ष तथा नगरसेवक राजू पाटील यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com