रुग्णवाढीचा गुणाकार व मृत्यूचे थैमान सुरूच

सुगत खाडे  
Monday, 21 September 2020

 जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णवाढीचा वेग सुद्धा वाढला आहे. जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून आतापर्यंत २ हजार १२५ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यासह कोरोनामुळे ५७ रुग्णांचा जीव सुद्धा गेला. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या २०९ झाली असून बाधितांची संख्या सुद्धा ६ हजार ५३२ झाली आहे. दरम्यान रविवारी (ता. २०) कोरोनाचे ९७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, त्यासह एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झाला.

अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णवाढीचा वेग सुद्धा वाढला आहे. जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून आतापर्यंत २ हजार १२५ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यासह कोरोनामुळे ५७ रुग्णांचा जीव सुद्धा गेला. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या २०९ झाली असून बाधितांची संख्या सुद्धा ६ हजार ५३२ झाली आहे. दरम्यान रविवारी (ता. २०) कोरोनाचे ९७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, त्यासह एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झाला.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे रुग्ण शहरांसह आता गाव खेड्यात सुद्धा आढळत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रूग्णवाढीचा जिल्ह्यात गुणाकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

त्यासह बळींची संख्या संद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याने जिल्ह्यात एक सप्टेंबरपासून आतापर्यंत २ हजार १२५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यासह कोरोनामुळे ५७ रुग्णांचा जीव सुद्धा गेला. दरम्यान कोरोना रुग्ण तपासणीचे २९९ अहवाल रविवारी (ता. २०) प्राप्त झाले. त्यापैकी ९७ अहवाल पॉझिटिव्ह तर २०२ अहवाल निगेटिव्ह आले. एक व्यक्तीचा बळी सुद्धा गेला. मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णामध्ये ५३ वर्षीय महिलेचा समावेश असून तिला १७ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. याव्यतिरीक्त कोरोनावर मात करणाऱ्या ४० जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या भागात आढळले नवे रुग्ण
कोरोनाचे रविवारी (ता. २०) सकाळी ५८ नवे रुग्ण आढळले. त्यात मूर्तिजापूर येथील २१, वाडेकर लेआऊट येथील सहा, जीएमसी व जुने शहर येथील प्रत्येकी चार, मोठी उमरी व चान्नी ता. पातूर येथील प्रत्येकी तीन, पातूर येथील दोन, जीएमसी येथील सात, अकोट येथील पाच, बालाजी नगर, अकोट फैल व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कृषी नगर, चांदूर, डाबकी रोड, मूर्तिजापूर, रणपिसे नगर, गंगा नगर, जीएमसी हॉस्टेल, पिंजर, बाळापूर, खडकी, चांदणी, रामनगर, कौलखेड, पातूर, चोहट्टा बाजार, दहिहांडा, हरिहरपेठ, भांबेरी ता. तेल्हारा, सार्थी, मोठी उमरी व सिरसोली ता. तेल्हारा, सुधीर कॉलनी, आनंद नगर, शास्त्री नगर, अकोट, गीता नगर, हिवरखेड, खदान, अकोला शहर, जठारपेठ, जामठी, सिरसो, बालाजी नगर, घुसर, सुयोग कॉलनी व तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

असे आढळले पॉझिटिव्ह रुग्ण
तारीख- मृत्यू- बाधित
०१- ०२ -२०
०२ -०५ -६४
०३ -०१- ७५
०४ -०३ -१०६
०५ -०२ -१२७
०६ -०० -९६
०७- ०१ -८३
०८- ०२ -७८
०९ -०४ -१११
१० -०१ -७५
११ -०२ -१४५
१२- ०२ -८६
१३ -०४ -२२६
१४ -०५ -१०३
१५ -०३ -६५
१६ -०३ -१२८
१७ -०४ -१९६
१८ -०७ -९८
१९ -०५ -१४६
२० -०१- ९७

कोरोना मीटर
- एकूण पॉझिटिव्ह - ६५३२
- मयत - २०९
- डिस्चार्ज - ४७३२
- ॲक्टिव्ह रुग्ण १५९१

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Sixteen hundreed active patients of Corona, 97 new positive; Another victim