esakal | राज्य सरकाने 50 लाख महिलांना केले ना उमेद
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: The state government did not give hope to 50 lakh women

राज्यात 2011 पासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद'ची (एमएसआरएलएम) अंमलबजावणी होत आहे.

राज्य सरकाने 50 लाख महिलांना केले ना उमेद

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला :  राज्यात 2011 पासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद'ची (एमएसआरएलएम) अंमलबजावणी होत आहे.

या अभियानात काम करण्यासाठी शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. पण आता सरकार या उमेद संस्थेला बाह्य संस्थेच्या हाती देण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात संस्थेतील विविध जिल्ह्यातील कंत्राटी महिलांनी मोर्चा काढला आहे.

राज्य सरकाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बाह्य संस्थेला देऊन राज्यभरातील जवळपास 50 लाख महिलांची केले ना उमेद केले आहे. यासाठी राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, गोंदीया, बुलडाणा, अकोला यासह विविध जिल्ह्यात महिलांनी मोर्चा सुध्दा काढला.

महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे 'उमेद' अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने  अभियानाला जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.

शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला असून, संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांच्या संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू राहावे, अशी राज्यातील महिलांची मागणी आहे. तसेच या अभियानात बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये, या मागणीसाठी 10 लाख महिलांनी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात एल्गार पुकारला.

महिलाआंदोलनाचे कारण काय?
'उमेद' कार्यक्रमाअंतर्गत राज्यात आतापर्यंत 4 लाख 79 हजार 174 समूह स्थापन करण्यात आले. यामध्ये 49 लाख 44 हजार 656 कुटुंब या कर्मचाऱ्यांनी एकमेकांना जोडले. मात्र, कोणतेही पूर्व सूचना न देता, काही जिल्ह्यात वेगवेगळ्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवा शासनाने अन्यायकारक पद्धतीने समाप्त केल्या आहे. अभियानाशी जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला. तसेच शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला, त्यामुळे संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठिकठिकाणी निषेध

  • अकोला जिल्ह्यातली महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला.
  • गोंदिया जिल्ह्यात हा मोर्चा आमदार विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
  • यवतमाळमध्ये स्वामिनी संघटनेच्या नेतृत्वात बचत गटांच्या महिला रस्त्यावर उतरल्या.

या आहेत मागण्या
अभियानाचे खासगीकरण होत असल्याचा आरोप मोर्चातील महिलांनी केला आहे. मोर्चातील महिलांच्या विविध मागण्या आहेत. उमेद अभियानास मिळणारा निधी शासनाने पूर्वरत करावा. महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरूच राहावे. यामध्ये बाह्यसंस्थेचा हस्तक्षेप होऊ नये. अशा विविध मागण्या या महिलांच्या आहेत.