शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करण्यासाठी झाडावर चढुन स्वाभिमानीचे आत्मक्लेश आंदोलन 

पंजाबराव ठाकरे
Thursday, 3 December 2020

शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करण्यासाठी व दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढुन अर्ध नग्ण होऊन आत्मक्लेश आंदोलन केले आहे. 

संग्रामपुर (जि.बुलडाणा): शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करण्यासाठी व दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढुन अर्ध नग्ण होऊन आत्मक्लेश आंदोलन केले आहे. 

दिल्लीमधे गेल्या आठ दिवसापासुन लाखो शेतकरी आंदोलनाला बसले आहेत त्या आंदेलनाला पाठिंबा देण्यासाठी मा.राजु शेट्टी यांनी राज्यभर आंदोलन पुकारले आहे.

त्याच धर्तीवर संग्रामपुर तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढुन केंद्र सरकारचा निषेध करीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यानी अर्ध नग्ण होउन आत्मक्लेश आंदोलन केले. झाडावर चढुन केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केल्या.

शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध असो,दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतक-यांना न्याय मिळालाच पाहीजे, अश्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलन दरम्यान शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करा.

दिल्लीत सुरु केलेल्या आंदोलकांच्या मागण्या मान्य करा अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. या मधे अनंता मानकर, नयन इंगळे, विलास बोडखे,मनोहर मोरखडे, प्रशांत बावस्कार, गोकुळ गावंडे,अमोल आगरकर, गजानन सोळे, प्रमोद बान्हेरकर, जया ठाकरे, विष्णुदास मुरुख,

विशाल गव्हाळे, शिवचरण बान्हेरकर, निखिल गावंडे, महादेव तेल्हारकर, ऊमेश नेरकर,प्रतिक उमाळे, दामु सोळे, अक्षय नेरकर, शुभम ठाकरे, आदींनी सहभाग घेतला होता.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Swabhimanis self-torture agitation by climbing a tree to repeal anti-farmer agriculture bill