भरधाव गाडीच्या धडकेत बापलेकासह तीन ठार, शेगाव-खामगाव रोडवरील घटना

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 30 October 2020

भरधाव स्कॉर्पिओ गाडीच्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बापलेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना ता.२८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.१५ वाजता शेगाव-खामगाव रोडवरील माऊली कॉलेज जवळ घडली.

शेगाव (जि.बुलडाणा)  भरधाव स्कॉर्पिओ गाडीच्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बापलेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना ता.२८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.१५ वाजता शेगाव-खामगाव रोडवरील माऊली कॉलेज जवळ घडली.

माऊली कॉलेजजवळ एम.एच.२८-एएन ७२६५ ही दुचाकी उभी करून स्वप्नील उर्फ लखन मरिभान बावणे (वय ३०), त्याचे वडील मरिभान हिरामन बावणे (वय ५०) आणि शेख रज्जाक शेख रहेमान (वय ४०) सर्व रा.सरकारी फैल शेगाव हे तिघे रस्त्याच्या कडेला उभे होते.

तेवढ्यात शेगावहून खामगावकडे जाणाऱ्या एम.एच.१५-बीएन ३३४९ या स्कॉर्पिओने धडक दिली. यामध्ये स्वप्नील बावणे व मरिभान बावणे हे दोघे बापलेक जागिच ठार झाले. तर शेख रजाक शेख रहेमान गंभीर जखमी झाला. त्याला अकोला येथे उपचारासाठी घेवून जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी शेख रहीम शेख रहेमान (वय ५०, रा. शेगाव) यांच्या तक्रारीवरून स्कॉर्पिओ चालक सुशिल सिध्दार्थ इंगळे ( रा. सातेगांव ता. अंजनगाव सुर्जी) याचे विरुद्ध अप क्र.२८१/२० कलम ३०४ अ २७९,३३८,४२७ भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ ज्ञानदेव ठाकरे हे करित आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Three killed, including Bapleka in Bhardhaw car crash, incident on Shegaon-Khamgaon road