सीताफळ शेतीतून दुष्काळावर मात करीत मिळविले चार एकरात तीन लाखांचे उत्पन्न

गजानन काळुसे
Friday, 9 October 2020

मागील काही वर्षांपासून सतत दुष्काळाचे सावट होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता,तरी सुद्धा तालुक्यातील शेतकरी शेतामध्ये विविध प्रयोग करून फळबाग क्षेत्र वाढत आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी प्रयोगशील आहेत. दुष्काळात सुद्धा शेतकऱ्यांनी फळबाग जगवून एक प्रकारे आदर्श निर्माण केलेला आहे.असाच प्रयोग सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा येथील प्रयोगशील शेतकरी सुभाषराव घिके यांनी ४ एकर शेतांमध्ये सीताफळाची लागवड केली आहे. त्यामधून त्यांना ३ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सद्या सीताफळाची काढणी सुरू केली आहे.

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा):  मागील काही वर्षांपासून सतत दुष्काळाचे सावट होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता,तरी सुद्धा तालुक्यातील शेतकरी शेतामध्ये विविध प्रयोग करून फळबाग क्षेत्र वाढत आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी प्रयोगशील आहेत. दुष्काळात सुद्धा शेतकऱ्यांनी फळबाग जगवून एक प्रकारे आदर्श निर्माण केलेला आहे.

असाच प्रयोग सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा येथील प्रयोगशील शेतकरी सुभाषराव घिके यांनी ४ एकर शेतांमध्ये सीताफळाची लागवड केली आहे. त्यामधून त्यांना ३ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सद्या सीताफळाची काढणी सुरू केली आहे.

शेतकरी सुभाषराव घिके यांनी जून २०१५ मध्ये बाला नगर जातीचे सीताफळाच्या सोपाची लागवड केली. ४ एकर मध्ये त्यांनी १४ × ८ वर सीताफळ रोपांची लागवड केली. सुरुवातीला सोपा साठी २×२ खड्डे तयार करून त्यामध्ये शेणखत, पालपाचोरा, टाकून भरण्यात आले

.त्यानंतर तयार केलेल्या खड्डामध्ये सीताफळ सोपांची लागवड करण्यात आली.प्रत्येक रोपाला ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यानंतर सीताफळा च्या रोपांची वाढ होण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये गौमुत्र , वर्मी कंपोस्ट , लिंबू अर्क , निमपेस्ट , यासह अनेक सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला आहे.सन २०१८-१९ मध्ये दुष्काळ असल्यामुळे पाण्याची कमतरता होते. त्यामुळे टँकर च्या सहाय्याने सीताफळा पाणी देण्यात आले , व दुष्काळा सर्वच सीताफळाचे रोपे जगविली.

  बालानगर जातीच्या सीताफळाला २०१९ मध्ये फळे येणास सुरुवात झाली,फळाचे पहिले वर्ष असल्यामुळे जवळपास ९ ते १० टन सीताफळाचे उत्पादन झाले. सीताफळ हे शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून सीताफळाची विक्री करण्यात आली. यावर्षी २०२० मध्ये ४ एकर साधारणपणे १७ ते १८ टना पर्यंत उत्पादन अपेक्षित आहे.

यावर्षी सीताफळाला भाव सुद्धा लागला असल्यामुळे जवळपास २.५ ते  ३ लाखा पर्यंत सीताफळा चे उत्पादन अपेक्षित आहे. सद्या सीताफळा ५५ रुपये ६० रुपये भाव सुरू आहे. त्यामुळे एका कॅरेट मध्ये साधारणपणे १७ ते १८ किलो सीताफळ बसतात त्यांचा भाव सद्या ५५ ते ६० मिळतो, त्यामुळे सीताफळाचे एक कॅरेट जवळपास ८०० ते ९०० रुपयाला विक्री होत आहे.त्यामुळे सीताफळाची शेती फायदेशीर ठरत आहे.

या ठिकाणी केली जाते सीताफळाची विक्री :-
सीताफळ काढणी झाल्यानंतर विक्री साठी जालना , औरंगाबाद , पुणे ,मुंबई , अकोला याठिकाणी विक्री साठी पाठवले जाते. याठिकाणी सीताफळा ला भाव चांगला मिळतो. शहरामध्ये सीताफळा नागरिकांची मागणी असल्यामुळे त्यामुळे त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या संपर्कात मध्ये राहुन सीताफळाची विक्री केली आहे.त्यामुळे नफा लागला मिळतो.

कृषी विभागाचे मार्गदर्शन फायदेशीर :-
सिंदखेड राजा तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सीताफळाची लागवड करण्यात आली, त्यामुळे कृषी विभागाकडून वेळोवेळी सीताफळाची पहाणी करून मार्गदर्शन व उपयोजना केले जाते. कृषी विभागाच्या योजना मधुन शेततळे घेतले असून त्यांचा उपयोग सीताफळाच्या बागेला फायदा होत आहे.

सिताफळाचा उपयोग :-
सीताफळाच्या गरा काढून त्यांची विक्री केली जाते. त्यांचा उपयोग आईस्क्रीम बनविण्यासाठी होतो. व बियांचा उपयोग तेल निर्मिती करता येतो. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या सीताफळ विविध कंपनी कडून मागणी असून सीताफळा भाव सुद्धा चांगला येतो.

शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन व उत्पन्न सीताफळा च्या माध्यमातून घेता येते.सीताफळासाठी साधारण व मध्यम स्वरूपाची जमीनी मध्ये लागवड करू चांगले उत्पादन घेवू शकतो. त्यांचप्रमाणे सीताफळा मध्ये सोयाबीन , हरभरा हे  आंतर पीक घेवू शकतो,त्यामुळे सीताफळ हे फायदेशीर ठरते. त्यामुळे जास्तीच जास्त शेतकऱ्यांनी सीताफळ लागवडी केले वळावे.
- सुभाषराव घिके , सिताफळ शेतकरी, किनगांव राजा ता.सिंदखेड राजा 

संपादन- विवेक मेतकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Three lakhs in four acres were obtained by overcoming the drought from custard apple farm