पुन्हा तीन बळी; २० नवे पॉझिटिव्ह, कोरोना बळीचे सत्र सुरूच

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 2 October 2020

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याअंतर्गत गुरुवारी (ता. १) तीन रुग्णांचा बळी गेला. त्यासह २० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या २३९ झाली असून एक हजार २५१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत.
 

अकोला  ः कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याअंतर्गत गुरुवारी (ता. १) तीन रुग्णांचा बळी गेला. त्यासह २० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या २३९ झाली असून एक हजार २५१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत.

कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातलं आहे. महानगरानंतर आता कोरोनाचे रुग्ण गाव-खेड्यातही आढळत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. दरम्यान गुरुवारी (ता. १) कोरोना रुग्णांच्या तपासणीचे २१८ अहवाल प्राप्त झाले.

त्यापैकी २० अहवाल पॉझिटिव्ह तर १९८ अहवाल निगेटिव्ह आले. याव्यतिरीक्त उपचार घेताना तीन रुग्णांनी दम तोडला. त्यापैकी एक रुग्ण तापडीया नगर येथील ७३ वर्षीय पुरुष होता.

त्याला २९ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा रुग्ण आदर्श कॉलनी येथील ७५ वर्षीय पुरुष होता. त्याला २६ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. तिसरा रुग्ण अंबिका नगर, अकोला येथील ६८ वर्षीय पुरुष होता. त्यास १८ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. सदर तीन मृत्यूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या २३९ झाली असून बाधितांची संख्या सुद्धा ७ हजार ५२५ झाली आहे.

या भागात आढळले नवे पॉझिटिव्ह रुग्ण
गुरुवारी सकाळी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व १६ पुरुषांचा आहे. त्यातील अकोट येथील तीन, बोर्डी ता. अकोट येथील दोन, तर उर्वरित केशवनगर, मोठी उमरी, शाहापूर, गीतानगर, कैलासनगर, किर्ती नगर, जीएमसी, जुने शहर, चिखलगाव, पातूर, राधाकिशन प्लॉट व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व एक पुरुष आहे. त्यातील राजाराम नगर कौलखेड, देवी खदान व गीता नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

१६१ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून गुरूवारी (ता. १) १८ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून ११, ओझोन हॉस्पीटल येथून एक, युनिक हॉस्पीटल येथून तीन तर होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेल्या १२८ जणांना अशा एकूण १६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना मीटर
- एकूण पॉझिटिव्ह - ७५२५
- मृत - २३९
- डिस्चार्ज - ६०३५
- ॲक्टिव्ह रुग्ण - १२५१

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Three more deaths; 20 new positive, corona victim sessions continue