अमेझीांग: आभाळ स्वच्छ असेत तर तुम्हाला आज मंगळ ग्रह सुध्दा बघता येणार

विवेक मेतकर
Wednesday, 14 October 2020

आज मंगळवारी एक महत्वाची खगोलशास्त्रीय घटना घडेल आणि सौर यंत्रणेत एक अद्भुत दृश्य दिसेल. मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल आणि त्याच्या तेजस्वी नारिंगी रंगात तो चमकताना दिसणार आहे.

अकोला  : आज मंगळवारी एक महत्वाची खगोलशास्त्रीय घटना घडेल आणि सौर यंत्रणेत एक अद्भुत दृश्य दिसेल.

मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल आणि त्याच्या तेजस्वी नारिंगी रंगात तो चमकताना दिसणार आहे. मात्र, असे असले तरी वातावरणातील बदलामुळे आकाशप्रेमींवर निराशा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

आज पृथ्वी आणि सूर्यासह मंगळ ग्रह एका सरळ रेषेत दिसतील.  अकोला येथील अवकाश तज्ज्ञ प्रभाकर दोड यांच्या म्हणण्यानुसार, जे लोक यावेळेस या खगोलीय घटनेस आणि सौर यंत्रणेतील या अद्भुत दृश्याला पाहण्यास मुकतील त्यांना नंतर आणखी १५ वर्षे वाट पाहावी लागेल आणि असे दृश्य ११ सप्टेंबर २०३५ रोजीच पाहायला मिळणार आहे.

मंगळवारी आपण आपल्या डोळ्यांनी देखील मंगळ ग्रहाला पाहू शकाल. ते म्हणाले की, सर्वात नेत्रदीपक आणि आश्चर्यकारक दृश्य असेही असेल की मंगळवारी संध्याकाळी जेव्हा पश्चिमेकडे सूर्य मावळत असेल तेव्हा पूर्वेला मंगळ उगवत असेल.

विज्ञानाच्या भाषेत या खगोलशास्त्रीय घटनेला मार्स अ‍ॅट अपोझिशन म्हटले जाते. सूर्य, पृथ्वी आणि मंगळ या तिन्ही ग्रहांचे एकाच वेळी सरळ रेषेत येणे हा खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी खरोखर एक अविस्मरणीय क्षण असेल. मध्यरात्रीपर्यंत मंगळ दक्षिणेकडे सरकेल आणि जर आपल्याकडे एक उच्च दर्जाची दुर्बिण असल्यास आपणास या ग्रहाच्या पृष्ठभागाची एक झलक देखील मिळू शकेल.

हा दूर्मिळ योग पाहण्यासाठी सद्या आकाश स्वच्छ असणे गरजेचे आहे. पहाटे चंद्राजवळ शुक्रही पाहता येईल. हे दोन्ही ग्रह एकमेकाजवळ सकाळी चारनंतर सुर्योदयापर्यंत राहणार आहेत. ज्यांना मंगळवारी हे बघता आले नाही त्यांना उद्याही ते पाहता येईल फक्त प्रत्येक दिवसाने हे अंतर वाढत जाणार आहे. कारण हे सगळे ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे हे अंतर आजच्या पेक्षा उद्या शुक्राच्या पूर्वेकडे चंद्र अधिक आलेला दिसणार आहे.
- प्रभाकर दोड, विश्वभारती विद्यान केंद्र, अकोला

(संपादन -  विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Today Mars is closest to Earth, amazing astronomical event, Mars at Opposition