esakal | आता जनावरांच्या वाहतुकीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

जनावरांच्या वाहतुकीस बंदी

कोरोना संकटात माणसांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली होती. आता हळूहळू प्रवासाची दारे उघडी होत असताना जिल्ह्यात जनावरांच्या प्रवासावर बंदी टाकण्याची वेळ आली आहे. अकोल्यासह राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’ या विषाणू संसर्गातून जनावरांना होणाऱ्या चर्मरोगाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यांनी जनावरांच्या वाहतुकीस बंदी घालण्याचा आदेश शुक्रवारी दिला.

आता जनावरांच्या वाहतुकीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला : कोरोना संकटात माणसांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली होती. आता हळूहळू प्रवासाची दारे उघडी होत असताना जिल्ह्यात जनावरांच्या प्रवासावर बंदी टाकण्याची वेळ आली आहे. अकोल्यासह राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’ या विषाणू संसर्गातून जनावरांना होणाऱ्या चर्मरोगाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यांनी जनावरांच्या वाहतुकीस बंदी घालण्याचा आदेश शुक्रवारी दिला.


जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. तुषार बावने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भात कोणत्या उपाययोजना राबवाव्या याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन जनावरांच्या वाहतुकीस मनाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.

मनपा आयुक्त, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांना यासंदर्भात सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत निर्देश देण्यात आले आहेत.


तीन लाख जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न
अकोला जिल्ह्यात दोन लाख ८३ हजार गाय व म्हैसवर्गातील जनावरे आहेत. सद्यस्थितीत त्यापैकी ३ हजार ३७२ जनावरांना हा संसर्ग झाला आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावने यांनी दिली. हा आजार उपचाराने बरा होतो. त्यासाठी संसर्ग झाल्याचे लक्षात येताच आपल्या जनावराला अन्य जनावरांपासून वेगळे करून त्याला तत्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात न्यावे, असेही डॉ. बावने यांनी सांगितले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)