Akola News: Travel by bullock cart for delivery
Akola News: Travel by bullock cart for delivery

मन सुन्न करणारी घटना; प्रसुती वेदना, गावच्या नदीला पूर अन् बैलगाडीचा खडतर प्रवास...

अकोला: राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून गेली कित्येक दिवसापासून ग्रामीण जनता या खराब झालेल्या रस्त्यावरून वावरत आहे याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे भारतास स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली मात्र अजूनही ग्रामीण रस्त्यांच्या विकासाकडे पाहिले जात नाही

ग्रामीण रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा करतच आहेत नेत्यांना लोकप्रतिनिधीनो या  ग्रामीण भागाच्या रस्त्याने  जर फिरकून पहा मग पहा कसा भयानक त्रास सहन करावा लागतो काही भागातील ग्रामीण रस्त्यांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कित्येक रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे

काहींना तर अजून मंजुरी मिळालेली नाही कित्येक दिवसापासून या काही भागातील रस्त्यांना मंजुरी मिळालेली नाही त्यांना  का मंजुरी मिळालेली नाही ते ग्रामीण भागात राहतात हा त्यांचा गुण दिसून येतो की काय ग्रामीण भाग असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामीण भागात अनेकदा जीववर प्रसंग बेततो.  

अकोल्यातील प्रसूती झालेल्या महीलेला व तिच्या बाळाला उपचारासाठी कावसा प्राथमीक आरोग्य केंद्रात बैलगाडीने न्यावे लागले ही दुर्देवी घटना लोकप्रतिनिधींच्या नजरेस कशी पडली नाही. हे नवलंच

अकोट तालुक्यातील पनोरी येथील एका महिलेला प्रसूती वेदना व्हायला लागल्या. पोट दुखत असल्याने दवाखान्यात नेण्यासाठी गावाच्या बाजूला असलेले पठार नदीवर आल्यावर नदीला दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला.

आणि गावामधून बाहेर जायला दुसरा मार्ग सुद्धा नव्हता. त्यामुळे त्या महिलेला खूप त्रास सहन करावा लागला. शेवटी गावातील आशा यांनी त्या महिलेची घरीच प्रसूती केली. पंरतु, खबरदारी म्हणून सकाळी त्या महीलेला कावसा प्राथमीक आरोग्य केंद्रात गावातील बैलगाडीने न्यावे लागले हे दुर्देवच म्हणावे लागेल. एकाच पावसात या गावाचा संपर्क तुटतो. गावाला जोडणारा दुसरा कुठला ही मार्ग नसल्याने गावकरी चिंतेत आहेत.

या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम लवकरात लवकर झाले नाही. तर पुलावर बसुन आंदोलन करु असा इशारा गावकरी यांच्या वतिने देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी गावाकडे येतात आणि मोठं मोठी आश्वासन देऊन जातात. मात्र प्रत्यक्षात कुठलच काम होत नसल्याने. ग्रामीण भागातील जनतेला हाल सोसावे लागतायत.

यावरही गावकऱ्यांचा द्राविडी प्राणायाम संपत नाही. कारण पीएचसीमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरही हजर नव्हते आणि रुग्णाला अकोला न्यायला रुग्णवाहिकाही वेळेवर हजर नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com