esakal | बापरे!; पहाटे साडेपाच वाजता शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी केली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Two minors committed suicide in a government juvenile detention center at 5.30 am

येथील चिखली रोडवरील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, बालगृहात दोन मुलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज ता 05:38 आली या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

बापरे!; पहाटे साडेपाच वाजता शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी केली आत्महत्या

sakal_logo
By
अरूण जैन

बुलडाणा : येथील चिखली रोडवरील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, बालगृहात दोन मुलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज ता 05:38 आली या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.


शुक्रवारी रात्री २ मुलांनी बंद खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी ता. 5 लटकलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळून आले .

मंगेश लक्ष्मण डाबेराव (वय १५), गजानन शंकर पांगरे (वय १७ ) असे मृतक  मुलांचे नाव समोर येत आहे. 

मृतदेह आढळलेल्या खोलीत ३ मुले होती. एक जण सुखरूप असून जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांचेसह शहर पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहचला असून पंचनामा व तपास सुरु आहे.

शहराच्या मुख्य वस्तीपासून दूर असलेल्या या भागात विरळ वस्ती आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

(संपादन - वि्वेक मेतकर)

loading image
go to top