esakal | कोरोनाने घेतला आणखी दोघांचा बळी; ३७ नवे पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Two more killed by corona; 37 new positive, four discharged

कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. २७) जिल्ह्यात ३७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. याव्यतिरीक्त दोन रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यापैकी एक रुग्ण बार्शीटाकळी येथील ३५ वर्षीय पुरुष असून त्याला १३ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

कोरोनाने घेतला आणखी दोघांचा बळी; ३७ नवे पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला   ः कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. २७) जिल्ह्यात ३७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. याव्यतिरीक्त दोन रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यापैकी एक रुग्ण बार्शीटाकळी येथील ३५ वर्षीय पुरुष असून त्याला १३ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

दुसरा रुग्ण जऊळखेड खुर्द, ता. अकोट येथील ४५ वर्षीय महिला असून तिला २५ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. सदर दोन मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या २९१ झाली आहे.

दिवाळीपूर्वी कमी झालेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये आता अचानक वाढ होत आहे. कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. २७) ३९८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३६१ अहवाल निगेटिव्ह, तर ३७ 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये २४ जणांचे अहवाल सकाळी पॉझिटीव्ह आले.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

त्यात सहा महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आलेवाडी ता. अकोट व मोठी उमरी येथील तीन जण, सातव चौक, गजानन नगर व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सुधीर कॉलनी, राधे नगर, जयहिंद चौक, भागवत प्लॉट, कॉग्रेस नगर, गोरक्षण रोड, अकोली जहागीर, दहातोंडा ता. मूर्तिजापूर, महागाव, शिवणी, जीएमसी व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. सायंकाळी १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात चार महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मलकापूर येथील तीन जण, रणपिसे नगर येथील दोन जण, तर उर्वरित गोपालखेड, लक्ष्मी नगर, हिंगणा फाटा, खडकी, मोठी उमरी, सिंधी कॅम्प, लहान उमरी व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

हेही वाचा - राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध होणार की शिक्षकांच्या संघटनांचे बळ !

चार जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून शुक्रवारी (ता. २७) एक जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, अशा एकूण चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

कोरोनाची सध्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ९२९०
- मृत - २९१
- डिस्चार्ज - ८३५७
- ॲक्टिव्ह रुग्ण - ६४२

(संपादन - विवेक मेतकर)

loading image