दोन विषारी सापांची सुरू होती प्रणयक्रीडा अन् गावकरी पडले चिंतेत

सकाळ वृत्तसेेवा | Wednesday, 21 October 2020

पातूर तालुक्यातील भंडारज येथे शनिवारी (ता.१७) रात्री अकरा वाजता दीपक लोध यांच्या गाई-म्हशीच्या गोठ्यात विषारी मोठ्या घोणसचा लाग सुरू होता. यामुळे लोध कुटुंब व गावकरी चिंतेत पडले होते. मात्र याबाबत माहिती मिळताच मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी भंडारज गाठून घोणसची जोडी जेरबंद केली आणि गोठ्यातील गुरांनाढोरांना जीवदान दिले.

अकोला  ः पातूर तालुक्यातील भंडारज येथे शनिवारी (ता.१७) रात्री अकरा वाजता दीपक लोध यांच्या गाई-म्हशीच्या गोठ्यात विषारी मोठ्या घोणसचा लाग सुरू होता. यामुळे लोध कुटुंब व गावकरी चिंतेत पडले होते. मात्र याबाबत माहिती मिळताच मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी भंडारज गाठून घोणसची जोडी जेरबंद केली आणि गोठ्यातील गुरांनाढोरांना जीवदान दिले.

भंडारज येथे काल दि.१७-१०-२०२० रोजी रात्री अकरा वाजता भंडारज हया गावात दिपक लोध यांच्या गाई - म्हशीच्या गोठयात विषारी मोठया घोणसचा लाग सुरू असल्यामुळे कुटुंब व गावकरी फार चिंतेत पडले. गावातील किसन बाळापुरे यांनी सर्पमित्र तथा मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे यांना, परिस्थिती सांगुन गोठ्यातील विषारी साप पकडणे फारच आवश्यक आहेत. अन्यथा ढोरांना किंवा व्यक्तिला धोकादायक ठरेल.

लोकांसाठी व वन्य जिवांसाठी तात्काळ व धाडसी प्रसंगात सेवा देणारे बाळ काळणे रात्री तिथे पोहोचले अत्यंत विषारी व रागीट घोणस व तेही प्रणय क्रिडेत पकडणे यासाठी फार हिम्मत व कौशल्य लागते . एक इंच दात लवचिक असलेले व तिव्र गतिने कुण्याही दिशेने दंश करण्याची क्षमता हया सापांमध्ये असते .

बाळ काळणे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने संयम व योग्य निर्णय घेत, प्रणय क्रिडेसहीत जेरबंद केले . गावकऱ्याना माहिती देतांना बाळ काळणे यांनी सापांना वाचवा व सुरक्षित कसे राहावे हे सांगितले, प्रणय क्रिडेत त्रास झाल्यास हे चवताळतात. नैसर्गिक क्रियेत कोणतीही बाधा न आणता ,म्हणून अंत्यत सावधगिरीने पकडावे लागले  

बावीस वर्षाच्या वर्षाच्या वन्यजिव सेवेत ही नर-मादी विषारी घोणस ची ही दहावी जोडी जिल्हात वाचवली. गावकऱ्याना योग्य ज्ञान दिले - सर्पमित्र तथा मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे अकोला

आवाहन : अतिवृष्टी मुळे विषारी साप शेतातील घर , कोठयात येण्याची शक्यता जास्त होत आहे . बिळामध्ये पाणिच पाणि असल्याने साप कोरडी जागा शोधत आहेत . शेताजवळील घरात , गोठयात येवू शकतात तरी सुरक्षितता घेणे , व सापांना वाचविण्याचे आवाहन बाळ काळणे नी केले.

(संपादन - विवेक मेतकर)