हृदयद्रावक...रात्री सव्वा अकरा वाजता मायलेकींनी रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा

प्रा.अविनाश बेलाडकर 
Monday, 5 October 2020

रेल्वे स्थाकावरील रात्री जवळपास सव्वा अकरा वाजताची वेळ... वय वर्षे 55 आणि वय वर्षे 30 अशा दोन महिला येतात... अन् चक्क रेल्वे रुळावर झोपून स्वतःची जीवनयात्रा संपवतात...आणि सर्वत्र चर्चांना उधान येते..

मूर्तिजापूर (जि.अकोला)  ः  रेल्वे स्थाकावरील रात्री जवळपास सव्वा अकरा वाजताची वेळ... वय वर्षे 55 आणि वय वर्षे 30 अशा दोन महिला येतात... अन् चक्क रेल्वे रुळावर झोपून स्वतःची जीवनयात्रा संपवतात...आणि सर्वत्र चर्चांना उधान येते..

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास करण्यासाठी सीसीटीव्हीचा आधार घेतल्या जातो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपास करताना दोन्ही महिला पश्चिम दिशेने येऊन प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बसलेल्या दिसल्या.

रेल्वे गाडी येण्यापूर्वी रुळावर जाऊन झोपल्याचे व त्यांचे देह छिन्नविछीन्न झाल्याचे निदर्शनास आले. त्या दोघी मायलेकी असल्याची चर्चा  होती.

MZR/Murtizapur Junction Railway Station Map/Atlas CR/Central Zone - Railway  Enquiry

वंदे मातरम आपात्कालीन पथकाचे सेनापती पुंडलिक संगले, अक्षय सूर्यवंशी, सोनू चौधरी, गौतम डींडोरे, सागर वांदे यांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले.

त्यांनी दोन्ही मृतदेह शव विछच्छेदनगृहात उत्तरीय तपासणीसाठी नेले. पुढील तपास ठाणेदार किरण कालवे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र जळमकर व हवालदार शेख कलीम करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Two women commit suicide by sleeping on railway tracks