अमरावती शिक्षक मतदारसंघात मतदारांची मतदानासाठी तुफान गर्दी

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 1 December 2020

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मतदारांत मोठ्या प्रमाणात उत्साह आढळून आला आहे. त्यामुळे 12 वाजेपर्यंतच या मतदार संघात 25.11 टक्के मतदान झाले आहे.

अकोला: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मतदारांत मोठ्या प्रमाणात उत्साह आढळून आला आहे. त्यामुळे 12 वाजेपर्यंतच या मतदार संघात 25.11 टक्के मतदान झाले आहे.

अमरावती विभाग मतदार संघात एकूण 5 जिल्ह्यातील शिक्षक मतदार आहेत. त्यानुसार 12 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात 25.62 टक्के मतदान झाले आहे.

अकोला येथे 23.32, वाशीम येथे 25.81, बुलढाणा येथे 24.40, तर यवतमाळ जिल्ह्यात 25.92 टक्के मतदान झाले आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात 10 हजार 386, अकोला येथे 6 हजार 480, वाशीम येथे 3 हजार 813, बुलढाणा येथे 7 हजार 484 तर यवतमाळ येथे 7 हजार 459 मतदार आहेत.

त्यापैकी आतापर्यंत पाचही जिल्ह्यात एकूण 25.11 टक्के मतदान झाले आहे यावरून शिक्षक मतदार संघात उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Voters in Amravati Shikshak constituency are excited for voting