esakal | लग्नाचा कपडा घेऊन जात असताना दोन नकली पोलिसांने अडविले, प्रकरण गेले पोलिसांत
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News was carrying a wedding dress when two fake policemen stopped him, the case went to the police

पोलिस असल्याची बतावणी करून मोटरसायकलस्वारांना अडवून पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पोलिसांना माना पोलिसांनी शनिवार, ता. २७ फेब्रुवारी रोजी अटक केली.

लग्नाचा कपडा घेऊन जात असताना दोन नकली पोलिसांने अडविले, प्रकरण गेले पोलिसांत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

कुरूम (जि. अकोला)   : पोलिस असल्याची बतावणी करून मोटरसायकलस्वारांना अडवून पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पोलिसांना माना पोलिसांनी शनिवार, ता. २७ फेब्रुवारी रोजी अटक केली.

समीर खान आसिफ खान या रोशनपुरा मूर्तिजापूर येथील युवकाने तक्रार दिली होती. तो चुलत बहिणीच्या लग्नाचे कपड्याची ऑर्डर अमरावती येथे दिली असल्याने त्याचे मित्रासह मूर्तिजापूर, हिरपूर, बोर्टा,भातकुलीमार्गे अमरावतीला मोटरसायकलने जात होता.

पिढी नदीच्या पुलाजवळ हिवरा कोरडे फाट्या समोर सोमवार, ता. २२ फेब्रुवारी रोजी आरोपी श्रीकृष्ण साहेबराव बुरघाटे (वय ३४), मंगेश उत्तमराव बुरघाटे (वय ३६ वर्षे रा.शिवर अकोला) यांनी समीर खान यांना थांबवून आम्ही पोलिस असल्याचे सांगितले. समिर खान व त्याचे मित्र त्यांना १०० रुपये देऊन अमरावतीकडे जाण्यास निघाले.

अमरावतीवरून लग्नाचा बस्ता घेऊन परत येत असताना सायंकाळी ६ वाजता दरम्यान आरोपींनी पुन्हा फिर्यादिस त्याच ठिकाणी थांबवले. यावेळी दोघेही आरोपी दारू पिलेले होते. संशय आल्याने फिर्यादीने त्यांना ओळखपत्राची मागणी केली.

त्यामुळे आरोपींनी फिर्यादीसोबत हुज्जत घातली. त्यानंतर ता. २७ फेब्रुवारीला फिर्यादीने माना पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून माना पोलिसांनी आरोपी श्रीकृष्ण बुरघाटे, मंगेश बुरघाटे याचे विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अधिक तपास माना पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक घनश्याम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पंजाबराव इंगळे, नंदकिशोर टिकार, सचिन दुबे, जयकुमार मंडावरे करीत आहेत.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

 

आर.आर.आबा सुंदरगांव पुरस्कारात सावळा गोंधळ

 

जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

 

बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

 

अकोला-अकोट रस्त्याचे काम सुरू न केल्याने प्रशासनाचे कठोर पाऊल

 

मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंग

loading image