या सापाच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नाही येणार, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड असण्याचं कारण तरी काय?

विवेक मेतकर
Wednesday, 26 August 2020

मांडूळ या सापाचा वापर सेक्स पॉवर वाढवण्यासाठी, नशेचे पदार्थ तयार करण्यासाठी, महागडे परफ्यूम तयार करण्यासाठी आणि कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात केला जातो. चला जाणून घेऊ या सापाविषयी आणखी काही खास गोष्टी..

अकोला : काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणाऱ्या मांडूळ जातीचा साप घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी (ता.२४) रंगेहात पकडले.

याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. या व्यक्तींचं नाव विकास श्रीराम सावळे (वय २१) व कृष्णा गणेश गुर्जर (वय २६) या दोघांना अटक केली. त्याच्याकडून एक दुतोंडा म्हणजेच मांडूळ साप ताब्यात घेतला. मंद हालचाल,जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक मिलिंदकुमार बहाकार यांना गोपनीय माहिती मिळाली की, पारस येथून दोघेजण दुचाकीने अकोल्यात मांडूळ जातीचा साप घेऊन येत आहेत. पोलिसांनी सापळा लावून त्यांना पकडले.

काहीही! हा साप खरंच पाडतो का पैशाचा ...

शाळा बंद तरी स्कूल बॅगमध्ये ठेवला साप
ची चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेल्या एका स्कूल बॅगमध्ये दुर्मीळ मांडूळ जातीचा साप दिसून आला. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी विक्री करिता घेऊन जात असल्याचे कबूल केले. पोलिसांनी या प्रकरणी पारस येथील एमईसीबी कॉलनीत रहिवासी असलेल्या विकास श्रीराम सावळे (वय २१) व कृष्णा गणेश गुर्जर (वय २६) या दोघांना अटक केली. त्यांची दुचाकीही जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काळ्या जादूसाठी वापरणाऱ्या सापाची ...

सापाची किंमत ऐकून व्हाल अवाक
पोलिसांना आधीच या सापाची विक्री केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या सापाची मार्केटमधील किंमत जवळपास ३ कोटी रूपयांपेक्षा अधिक सांगतिले जाते. त्यामुळे अर्थातच या सापाला एवढी किंमत का असा प्रश्न लोकांना पडतो.

काळ्या जादूसाठी वापरणाऱ्या सापाची ...

कशासाठी होतो वापर
मांडूळ या सापाचा वापर सेक्स पॉवर वाढवण्यासाठी, नशेचे पदार्थ तयार करण्यासाठी, महागडे परफ्यूम तयार करण्यासाठी आणि कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात केला जातो. चला जाणून घेऊ या सापाविषयी आणखी काही खास गोष्टी....

कुठे राहतो हा साप?
हा साप जास्त करून वाळूमध्ये राहतो. अ‍ॅनाकोंडाप्रमाणे या सापाचे डोळे डोक्यावर असतात. शिकारीसाठी हा साप वाळूमध्ये स्वत:ला लपवतो आणि केवळ त्याचं डोकं वर राहतं. शिकार जवळ येताच त्यावर हल्ला करतो. परदेशात अनेकजण हा साप पाळतात सुद्धा. सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.

सर्प रक्षकांनी सांभाळलेल्या ...

प्रजननाचं माध्यम
मांडूळ सापांमध्ये प्रजनन मादा द्वारे अंडी देऊन होतं. जन्मावेळी सापाची लांबी आठ ते दहा इंच इतकी असते. त्यांचा प्रजननाचा काळ हा पानझळ किंवा थंडीच्या दिवसात असतो. 

१० लाखांच्या जिवंत मांडूळाची ...

कुठे आढळतात हे साप?
या सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आढळून येतात. एक प्रजाती उत्तर अमेरिकेतील मुख्य रूपाने प्रशांत महासागराच्या तटावर आढळून येते. एक प्रजाती यूरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये आढळते. तर भारतात आणि आफ्रिकेतही एक प्रजाती आढळते.

मांडूळ तस्करी प्रकरणी तिघे ताब्यात ...

काय खातात आणि कशी करतात शिकार?
इतर सापांप्रमाणेच हा साप देखील मांसाहारीच आहे. या सापांच्या राहण्याच्या ठिकाणाच्या आधारावर शिकार वेगवेगळे असतात. तसे हे साप जास्त करून उंदीर, पाल, बेडूक, ससे इत्यादी शिकार करतात. वाळूच्या खाली लपून हा साप शिकारीची वाट बघतो. शिकार जवळ आल्यावर आपल्या धारदार दातांनी त्यावर हल्ला करतो. तसेच शिकार बेशुद्ध होईपर्यंत त्यांचं रक्त पित राहतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News, What is the reason for the high demand for forehead snake in the black market?