‘नीट’ परिक्षेचा निकाल तर आला, आता पुढे काय ?

विवेक मेतकर
Saturday, 17 October 2020

नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला आहे. देशभरातून १५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या माध्यमातून आपले नशीब आजमाले आहे. असे असले तरी निकालानंतर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असंख्य प्रश्न घोंगावत असतात. 

अकोला: नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला आहे. देशभरातून १५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या माध्यमातून आपले नशीब आजमाले आहे. असे असले तरी निकालानंतर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असंख्य प्रश्न घोंगावत असतात. 

 कोरोनाच्या काळात मुलांना परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी पाठवावे की नाही ? यासंदर्भात अकोला येथील प्रसिध्द साहित्यिक, अभ्यासक अॅड.अनंत खेडकर दिलेली ही माहिती.
 

निटच्या परिक्षेनंतर विद्यार्थी आणि पालकांची खरी परिक्षा सुरू होते. 

आता पुढे काय ? 

ज्यांना मिळाले यश
त्यांनी ईतिहास दाखवावा रचून
ईतरांनीही जिद्द बाळगगावी मनी
मुळीच जाऊ नये खचून

ज्यांना अपेक्षीत मार्क मिळाले ते आनंदात आहेतचं पण ज्यांना मार्क कमी पडले त्यांनी काय करावे ?
जे पालक फी किंवा डोनेशन भरू शकतात.
ते पाल्यांसाठी खाजगी विद्यापीठांत प्रयत्न करतील पण ज्यांना हा खर्च झेपणार नाही त्यांचे काय ?

त्यांचेपुढे चार पर्याय आहेत

१) पुन्हा रिपीट करणे

२)परदेशात कमी खर्चात प्रवेश घेणे

३)किंवा एमबीबीएस व्यतिरिक्त ईतर   वैद्यकिय शाखेत प्रवेश घेणे

४) किंवा दुसरा अन्य मार्ग निवडणे

आता प्रश्न येतो तो परदेशातील एमबीबीएसचा. परदेशात पाठवायचे तर कोरोनाचे सावट जगभरात आहे अशा परिस्थतीत कोणता निर्णय घ्यावा ?

आता परदेशातील प्रोव्हजनल प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत पण काॅलेज कधी सुरू होणार ? 

मुलांना कधी पाठवायचे ? 

तर, जो पर्यंत सर्व परिस्थिती सुरळीत होणार नाही. तो पर्यंत मुलांना आपले सरकार तेथे पाठवणार नाही.

तसेच परदेशातील ज्या विद्यापीठांत प्रवेश घेतला तो देश सुध्दा मुलांना परिस्थिती योग्य असल्याशिवाय तेथे बोलावण्याचा धोका पत्करणार नाही.

यावर जोपर्यंत सर्व सुरळीत होणार नाही तो पर्यंत ऑनलाइन क्लासेस किंवा इतर काही ऊपाययोजना संबंधित विद्यापीठ करणार. त्या विषयी पुढचे धोरण विद्यार्थी वर्गाला नक्की कळवल्या जाईल . 

जर परदेशात पाठवायचे म्हटले तर प्रवेश घेणे आवश्यक आहे . अन्यथा कोरोना जाण्याची प्रतिक्षा करीत बसल्यास प्रवेशाची तारीख निघुन जाईल . 

नीट' न दिलेल्या विद्यार्थ्यांना उद्या पुन्हा परीक्षा देण्याची संधी |  Gomantak

परदेशात प्रवेश घेतांना पालकांनी कोणती काळजी घ्यावी ?

ज्या संस्थेमार्फत तुम्ही प्रवेश घ्याल त्यांचे कडून पुढे काय ? 
याची आधीच खातरजमा करा . 

संपूर्ण सुरक्षा आणि पुढील धोरण निट समजाऊन घ्या . 

आणि पूर्ण खात्री व समाधान झाल्या शिवाय निर्णय घेऊ नका .

विद्यापीठ हे मान्यताप्राप्त आहे की नाही ?

एकुण फी किती ?

वार्षिक फी किती ?

होस्टेल फी किती ?

किती वर्षाचा शिक्षणाचा कालावधी आहे ?

होस्टेल, मेस, शैक्षणिक दर्जा इतर कोणत्या सुविधा ऊपलब्ध आहेत. याची विस्तृत माहिती अगोदरचं घ्या.

परदेशात प्रवेश घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

शक्यतो सर्व व्यवहार चेक किंवा ऑनलाइन करा आणि पावती घ्या म्हणे भविष्यात काही अडचण आल्यास तुमचे जवळ त्याचा पुरावा राहिल.

परदेशात जातांना सोबत अत्यावश्यक अशा कोणकोणत्या वस्तु न्याव्यात ?

विमान प्रवासात किती किलो सामान सोबत नेऊ शकतो ?

संपुर्ण शिक्षण होईपर्यंत अंदाजे सर्व खर्च किती येऊ शकतो ? 

याचीही माहिती जरूर घ्या कारण पुढील पैश्यांचे योग्य नियोजन करणे सोपे जाईल .

काही काही विद्यापिठात वार्षिक फी ही दोन टप्प्यात भरण्याचीही सुविधा आहे. ते ही जाणून घ्या.

काही विद्यापीठांत तेथे एमबीबीएस ला मेरिटचे मार्क मिळाले तर स्काॅलरर्शिप मिळते
त्याचे नेमके स्वरूप आणि पात्रता काय ?

काही पालक बॅंकेच्या शैक्षणिक लोन (कर्ज) बाबत विचारणा करतात. पण, बॅंकेने शंभरटक्के खात्री दिल्यानंतरच पुढील पाऊल टाका.

या व्यतिरिक्तसुध्दा काही प्रश्न असल्यास त्याची देखील माहिती घ्या .

कारण ज्या संस्थेमार्फत विद्यार्थी जाणार आहे. ती संस्था तुमचेकडून त्याचे ‘सेवाशुल्क’ घेते. आणि तुम्ही संपूर्ण माहिती घेणे हा तुमचा अधिकार आहे .

या शिवाय ह्या संस्थेने आतापर्यंत कोणकोणत्या देशात आणि विद्यापीठात विद्यार्थ्थांना पाठवले आहे ?, ज्यांना पाठवले त्यांचा संस्थेबाबत अनुभव कसा आहे ? तसेच यंदा आपल्या परिसरातील किंवा
ओळखीचे कोणते विद्यार्थी तुमच्या सोबत पाठविणार आहेत का ? शक्य असल्यास त्यांचेशी आणि त्याच्या पालकांशी अगोदरचं संवाद साधून घ्या. म्हणजे एकदुसऱ्यांना मदत करून पुढील काळातही
काही अडचण आल्यास सहकार्य करता येते.

या सारखे विवीध प्रश्न लेकरांच्या आणि पालकांच्या मनात असतात

माझी मोठी कन्या परदेशातुनच एमबीबीएस झाली असुन धाकटी लेक सुध्दा परदेशातच वैद्यकिय शिक्षण घेत आहे. त्यामुळे मी सुध्दा  या प्रसंगातुन गेलेलो आहे.

म्हणूनच
मला जी काही माहिती आहे. ती मागील पाच वर्षापासुन ‘सेवाभावी’ वृत्तीने मी कोणताही मोबदला न घेता विद्यार्थी आणि पालकांना देत असतो. आपणासही काही अडचण असल्यास आपण मला संपर्क करू शकता. अनेक त्यागी आणि सेवाभावी महानुभावांनी लेकरांच्या ऊज्वल भवितव्यासाठी समर्पित
भावनेने शिक्षण संस्था ऊभ्या केल्या.

 

आपल्या महाराष्ट्राची ही गौरवशाली परंपरा आहे. त्या मुळे माझ्या मनात आले की आपण किमान इतरांना माहिती तरी द्यावी आणि आपल्या परिने खारीचा वाटा ऊचलण्याचा प्रयत्न करावा .ही माहीती इतरांनाही जरूर पाठवा  आणि या सेवाभावी शिक्षणाच्या दिढीचे वारकरी व्हा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Whats next after the neet exam?-adv.anant khedkar