अकोला : दोन उड्डाणपुलाचे गडकरींच्या हस्ते आज उद्‍घाटन

वणी रंभापूर येथे करणार शेततळ्यांची पाहणी; विविध कार्यक्रमाला हजेरी
Akola Nitin Gadkari inauguration two flyover bridges
Akola Nitin Gadkari inauguration two flyover bridgessakal

अकोला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या राजराजेश्वर नगरीमध्ये येत आहे. दोन उड्डाणपुलासह एकूण ३६५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकापर्ण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय वणी रंभापूर येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील शेततळ्याची पाहणी ते करणार असून, शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे,आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल यांच्या नेतृत्वात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी झटत आहेत.

अकोला शहराच्या वाहतुकीची कोंडी तसेच कमी खर्चात दळणवळणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शिवर ते रिधोरा हा १३ किलोमीटरचा सिमेंट काँक्रिट रस्ता चौपदरीकरण करण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण तसेच दक्षता नगर ते हुतात्मा स्मारकापर्यंतच्या संत कवरराम उड्डाणपूल तसेच शाहिद भगतसिंग चौक ते अग्रसेन चौकापर्यंतच्या भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपूलाचा लोकार्पण सोहळा शनिवारी दुपारी २.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

या उड्डाणपुलाला अंडरपास निर्माण करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू, नॅशनल हायवेचे दिलीप ब्राह्मणकर, राजीव अग्रवाल, आमदार रणजित पाटील, आमदार अमोल मिटकरी, आमदार किरण सरनाईक, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार नितीन देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, आमदार लखन मलिक आदींची उपस्थिती राहणार आहे.

या विकास कामांची होणार घोषणा

बार्शीटाकळी रेल्वे उड्डाणपूल, अकोट रेल्वे उड्डाणपूल, अकोला-वाशीम-अकोट बायपास प्रस्तावित आहे. या कामांची घोषणा केंद्री मंत्री नितीन गडकरी करणार आहेत.

पार्किंगची व्यवस्था चार ठिकाणी

भाटे क्लब, शास्त्री स्टेडियम, जिल्हा परिषद शासकीय कन्या विद्यालय, वसंत देसाई स्टेडियम समोर, उर्दू हायस्कूल हॉटेल स्कायलार्कच्या बाजूला रतनलाल प्लॉट येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com