
अकाेला : पावसामुळे पाळोदी-गोत्रा रास्ता गेला वाहून
आगर - आगरसह परिसरात अनेक दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने मोर्णा नदीला आलेल्या पुराने पाळोदी-गोत्रा असलेला रोड पूर्णतः वाहून गेला, त्यामुळे आगर व अकोला येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना रस्त्यावर पायी चालणेही कठिण झाले आहे.
आगरसह परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने मोर्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर गेल्याने पुराचे पाणी रस्त्यावरून व गोत्रा-खांबोरा येथील पुलावरून चार-पाच फुटांच्या वरून गेल्याने एक किमीपर्यंत रोडवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत, परिणामी दुचाकी चालवणे दूरच पायी चालणेही कठीण झाल्याने विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गोत्रा येथे जिल्हापरिषद अंतर्गत इयत्ता चौथीपर्यंत शाळा आहे, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आगर व अकोला येथे जावे लागते. गोत्रा येशील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी आहेत.
रस्ता सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना याकडे लक्ष देऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्तीसाठी तगादा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांची होत आहे. गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद पडल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता नियम शिथिल झाले आणि विद्यार्थ्यानी शाळेची वाट धरली नाही तोच पावासाने वाहून गेलेल्या रस्त्यामुळे पुन्हा शाळेची वाट बिकट झाली आहे.
जिल्हा परिषद सभागृहात रस्ता दुरुस्तीचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, लवकरात लवकर रस्त्याचे तत्पुरती दुरुस्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दखल घेत आहे.
- वेणुताई डाबेराव, जि.प. सदस्य, आगर.
गोत्रा गाव पोळोदी गट ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट आहे. पुराने रस्त्यावर खड्डे पडले, असून ये-जा करताना पायी चालणे कठीण झाले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना ता.२० जुलै रोजी निवेदन दिले. त्यात नदीच्या पुराने नुकसान झालेल्या सर्वच विषयांचा समावेश आहे.
- वासुदेव वक्टे, सरपंच, गट ग्रामपंचायत पोळोदी-गोत्रा.
Web Title: Akola Pallodi Gotra Road Damage Due To Heavy Rain Morna River Flood
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..