अकोला : बेरोजगारांना मिळणार रोजगार; २२७ पदांच्या भरतीचे नियोजन

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ८ जुलै रोजी
jobs Recruitment
jobs RecruitmentSakal

अकोला : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे. मेळाव्यात २२७ पदांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. मेळाव्यात रोजगार इच्छुक युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

रोजगार मेळाव्‍यात क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लिमीटेड अकोला व बुलडाणा करीता ट्रेनी केंद्र व्यवस्थापक ५० पदे, नमस्ते व्हेंचर्स प्रायव्हेट लिमीटेड अकोला या कंपनीसाठी २६ पदे, नवभारत फर्टीलायझर, औरंगाबाद करीता सेल्स ट्रेनी- ५१, महिंद्रा महिंद्रा लिमीटेड पुणे साठी ५०, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमीटेड पुणे साठी ५० असे एकूण २२७ पदांच्या भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. सहभागासाठी उमेदवारांनी कौशल्‍य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्‍यता विभागाच्‍या संकेतस्‍थळाला भेट देऊन आपल्‍या सेवायोजन कार्डचा यूझर आयडी व पासवर्डचा वापर करुन शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच इतर जिल्‍ह्यातील उमेदवारही अर्ज शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com