अरे देवा...कोरोनाची भीती एवढी की, अंत्यसंस्कारासाठी हातगाडीवरूनच नेला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

कोरोनाच्या भीतीमुळे सामजातील माणुसकी हरवली असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत रोज आपण काहीना-काही ऐकत आहो. शुक्रवारी (ता.29) शहरातील एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने, त्याला खांदा द्यायलाही कोणी तयार नसल्याने अखेर नातेवाईकाने हातगाडीवर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेऊन अंत्यसंस्कार केले.

तेल्हारा (जि. अकोला) : कोरोनाच्या भीतीमुळे सामजातील माणुसकी हरवली असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत रोज आपण काहीना-काही ऐकत आहो. शुक्रवारी (ता.29) शहरातील एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने, त्याला खांदा द्यायलाही कोणी तयार नसल्याने अखेर नातेवाईकाने हातगाडीवर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेऊन अंत्यसंस्कार केले.

क्लिक करा- Video: गरिबांच्या बादामची श्रीमंती पहा

पत्नीच्या भावाने केले सहकार्य
कोरोनाच्या महामारीने एक धास्ती प्रत्येकाच्या मनात बसली आहे. स्वतःचे नातेवाई सुद्धा अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येत नसल्याच्या घटनांमधून बघायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार शहरातील आठवडी बाजारात राहणारे गजानन भटकर (वय 55) व्यक्तीचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. घरात पत्नी व लहान मुले. त्यात लॉकडाउन मुळे नातेवाईक येऊ शकले नाहीत.

घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची त्यामुळे अंत्यसंस्कार करणे सुद्धा कठीण. त्यात मृतदेहाला खांदा द्यायला कोणी नसल्याने मोठा प्रश्‍न मृतकाच्या पत्नी समोर उभा राहला होता. मृतकाच्या पत्नीचा भाऊ शहरातच राहतो कोणी खांदा द्यायला तयार नसल्याने त्यांनी हातगाडीवर मृतदेह ठेऊन स्मशानभूमी गाठली व मृतकावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने माणुसकी हरवली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

हेही वाचा- अरेरे...शेत शिवारात झाला चक्क लाल अश्रूंचा सडा, पहा काय झाले असे..

युवकाने दिला माणुसकीचा परिचय
शहरातील शिवाजी चौक येथे राहणारा युवक मनीष गवळी याने स्वतःहून पुढाकार घेऊन मृतकाच्या घरच्या परिस्थिती बद्दल माहिती घेतली. परिस्थिती हलाकीची असल्याचे समजल्याने, त्याने मृतकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारा खर्च देऊन आपली माणुसकी दाखवली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Parthiva fue llevada a Chaki para la cremación