अकाेला : ट्रॅव्हल्सधारकांद्वारे प्रवाशांची लूट

पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूरचे अव्वाच्या सव्वा भाडे
Akola Private bus tickets rates increase
Akola Private bus tickets rates increase sakal

अकोट : लग्नसराई पाठोपाठ उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्‍वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स धारकांनी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूरसह अन्य महानगरांकडे जाणाऱ्या आराम बसेसच्या भाडेपट्टीत मनमानी पद्धतीने बेसुमार वाढ करत संपूर्ण सीझन कॅश करण्याकरिता प्रवाशांची खुलेआमपणे लूट सुरू केली आहे.

अकोट शहरासह जिल्ह्यातून पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिकसह अन्य महानगरांकडे मोठ्या प्रमाणावर खासगी आराम बसेस धावतात. विशेषतः अकोटहून या महानगरात दहा ते बारा ट्रॅव्हल्स धावत आहेत. जिल्ह्यातूनही शेकडो गाड्या प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. कहर म्हणजे लग्नसराई व उन्हाळी सुट्ट्यांचा सीझन ओळखून या व्यवसायात काहींनी मोडकळीस आलेल्या बसेस सर्रासपणे, पूर्णतः बेकायदेशीरपणे रस्त्यावर आणल्या असून, त्या बसेस खुलेआमपणे धावत आहेत.

उपप्रादेशिक परिवहन महामंडळाकडून फक्त कर्तव्यदक्षपणाचा वेळोवेळी दिखावा करण्यात येते. परंतु, लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांमधून खासगी ट्रॅव्हल्सधारकांनी लूट सुरू केली असताना या विभागाकडून कुठलेही उपाययोजना केली नाही. बऱ्याच कालबाह्य झालेल्या वाहनातून प्रवासी कोंबून बिनधास्तपणे धावत आहेत. ट्रॅव्हल्सधारकांनी एकूण सीझन कॅश करण्याकरीता भाडेदरात सुद्ध अक्षरशः मनमानी सुरू केली आहे.

ऑनलाईनद्वारे बुकींग सुरू आहेत. परंतु, त्या ठिकाणीही तिकिटांचे दर डोळे पांढरे करणारे ठरत आहेत. ऑनलाइनद्वारे रिझर्व्हेशन फुल्ल दाखवले जात असताना ऑफलाइनद्वारे पैसे मोजल्याबरोबर सहजपणे तिकीट उपलब्ध होत आहे, पण त्यासाठी दाम दुप्पटच पैसे आकारले जात आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसची सेवा अद्याप पूर्णतः पूर्वपदावर आली नाही. परंतु, परिवहन महामंडळाने तातडीने लांब पल्ल्याच्या बसेसची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे, मात्र त्याबाबत कोणीही लोकप्रतिनिधी ओळीने सुद्ध बोलत नाहीत.

आधीची व आताची भाडेवाढ

  • अकोट ते पुणे आधी ः एक हजार ३०० रुपये

  • अकोट ते पुणे आता ः एक हजार ४०० ते एक हजार ५०० रुपये

  • अकोट ते मुंबई आता ः एक हजार ६०० ते दोन हजार २०० रुपये

  • अकोट ते औरंगाबाद आता ः ७०० ते ८०० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com