Akola- पूर्णा ब्रॉडगेज मार्गाला १३ वर्षे पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला - पूर्णा ब्रॉडगेज
अकोला-पूर्णा ब्रॉडगेज मार्गाला १३ वर्षे पूर्ण

अकोला - पूर्णा ब्रॉडगेज मार्गाला १३ वर्षे पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणारे अकोला रेल्वे स्थानकाचे नाव भारतात उत्पन्न देणाऱ्या पहिल्या १०० स्थानका मध्ये आहे. अकोला स्थानकाहून दक्षिण मध्य रेल्वेचा हैदराबाद-अजमेर मार्ग सुद्धा जोडला आहे. भारतातील रेल्वे मार्गांचा विकास करण्या अंतर्गत अकोला- पूर्णा मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यात आले. त्याला ११ नोव्हेंबर २०२१ रोजी १३ वर्षांपूर्ण होत आहे. मात्र, हा मार्ग आजही उपेक्षितच आहे.

सन २००८ मध्ये ब्रॉडगेजचे काम पूर्ण होऊन पहिली पूर्णा-अकोला पॅसेंजर या मार्गावर ११ नोव्हेंबर २००८ रोजी धावली होती. लोकप्रतिनी व प्रवाश्यांची उत्साहाने या पॅसेंजरचे स्वागत केले होते. ब्रॉडगेज झाल्यानंतर या मार्गाचा विकास होईल, अशी प्रवाश्यांची अपेक्षा होती. मात्र हा मार्ग जाणीवपूर्वक दुर्लक्षित राहिला. प्रवाश्यांचा प्रतिसाद, रेल्वे प्रवासी संघटनच्या मागण्या असतांना सुद्धा या मार्गावर अपेक्षित विकास झाला नसल्याची खंत रेल्वे प्रवासी संघटनेचे ॲड. अमोल इंगळे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

लोकप्रतिनिधींची उदासीनता केंद्रात तसेच राज्यातील सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यानंतर सुद्धा लोकप्रतिनिधींकडून मार्गाचा विकास केला नाही. रेल्वे प्रवासी संघटनांनी लोकप्रतिनिधींकडे मागणी करून सुद्धा याबाबत कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाही. गेल्या तेरा वर्षांत या मार्गावर लोकप्रतिनिधींकडून अकोल्यातून एकही नवीन ट्रेन सुरू करण्यात आली नाही.

अशा आहेत प्रलंबित मागण्या - अकोला स्थानकांवर पिट लाईन बनवण्याची मागणी. - नांदेड स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे अकोला स्थानकावरून सुरू करण्याची मागणी. - साप्ताहिक सुरू असलेल्या रेल्वे यांना नियमित करणे. - स्पेशल च्या नावावर सुरू असलेल्या रेल्वे नियमित करण्यात आल्या नाही. -अकोला - अकोट मार्ग सुरू केला नाही. - दक्षिण मध्य रेल्वे मार्ग मध्य रेल्वेला जोडण्यात आलेला नाही. - उत्तर - पूर्व भारत करिता थेट गाडी अद्याप मिळाली नाही. - अमरावती पुणे एक्स्प्रेस, अकोला - परळी, अकोला - पूर्णा पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्यात आल्या नाहीत. - हैदराबाद-नागपूर- इटारसी व मिरज- पुणे- भुसावळ मार्ग साप्ताहिक धावणाऱ्या रेल्वे हैदराबाद-अकोला- खांडवा मार्ग सुरू कराव्यात.

loading image
go to top