अकोल्याला मिळाल्या २० हजार लस

४५ वर्षावरील लाभार्थींचे आजपासून लसीकरण: प्रथमच कोव्हॅक्सिन जिल्ह्यात
रेमडेसिव्हर
रेमडेसिव्हरFile Photo

अकाेला : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे एकीकडे लसिकरणासाठी गर्दी होत असताना लस अपुरी पडत असल्याचे दिसून आले. मात्र बुधवारी अकोला मंडळासाठी कोव्हॅक्सिनचे ५६ हजार, तर कोविशिल्डचे ७१ हजार ७००, असे एकूण एक लाख २७ हजार ७०० डोस प्राप्त झाले आहेत. त्यात अकोल्यासाठी कोव्हॅक्सिनचे १२ हजार, तर कोविशिल्डचे आठ हजार डोस आहेत. Akola received 20,000 vaccines

लस प्राप्त झाल्याने गुरुवारपासून अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये ४५ वर्षावरील लसीकरणास सुरुवात होईल. गत आठवडाभरापासून ४५ वर्षावरील लाभार्थींची कोविड लसीकरण मोहीम अकोला मनपा क्षेत्रात प्रभावित झाली होती.

लसी अभावी अनेक लाभार्थींना लसीकरण केंद्रावरून परतावे लागले होते. याच काळात १८ ते ४५ वर्ष वयोगटातील लाभार्थींना लस उपलब्ध झाली. त्यामुळे ४५ वर्षावरील लाभार्थींमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. बुधवारी सकाळी आरोग्य विभागाला लसीचा साठा प्राप्त झाल्याने जिल्ह्यात थांबलेली लसिकरणाची मोहीम पुन्हा सुरू होणार आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com