Akola Riots : दंगलीमुळे 'छावा'ने केली मिरवणूक रद्द; साजरी केली 'घर घर संभाजीराजे जयंती' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Maharaj Jayanti

'छावा'ची सार्वजनिक संभाजी राजे जयंती (Sambhaji Raje Jayanti) रद्द झाल्याने जिल्ह्यातील हजारो 'छावा' कार्यकर्त्यांनी आपापल्या घरीच संभाजी राजेंचे पूजन करून त्यांची जयंती साजरी केली.

Akola Riots : दंगलीमुळे 'छावा'ने केली मिरवणूक रद्द; साजरी केली 'घर घर संभाजीराजे जयंती'

अकोला : शनिवारी रात्री अकोला शहरात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे (Akola Riots) प्रशासनातर्फे १४४ कलम जारी करण्यात आले. त्यामुळे 'छावा' संघटनेतर्फे श्री शिवाजी महाराज पार्क येथून ता. १४ मे रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेली मिरवणूक रद्द करण्यात आली.

परिणामी, कार्यकर्त्यांचा प्रचंड हिरमोड होवून मिरवणुकीची सर्व तयारी व्यर्थ गेली. मागील दोन वर्षे कोरोनामुळे ही मिरवणूक काढण्यात आली नव्हती. त्यामुळे या वर्षी सुमारे २५ हजार युवकांचा, नागरिकांचा सहभाग राहील एवढ्या प्रचंड मिरवणुकीची तयारी करण्यात आली होती.

'छावा'ची सार्वजनिक संभाजी राजे जयंती (Sambhaji Maharaj Jayanti) रद्द झाल्याने जिल्ह्यातील हजारो 'छावा' कार्यकर्त्यांनी आपापल्या घरीच संभाजी राजेंचे पूजन करून त्यांची जयंती साजरी केली. 'छावा'चे जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोडे यांनी रविवारी सकाळीच त्यांच्या घरी संभाजी राजांच्या प्रतिमेचे पूजन करून 'घर घर जयंती'चा शुभारंभ केला.

'घर घर जयंती'च्या घोषणेनुसार डॉ. दीपक मोरे, प्रदीप खाडे, डॉ. संजय सरोदे, डॉ. श्रीराम लाहाळे, अरविंद कपले, अनिरुद्ध भाजीपाले, प्रा. नितीन बाठे, डॉ. अमोल रावणकर, ओमप्रकाश सावल, विजय मालोकार, रजनीश ठाकरे, डॉ. हर्षवर्धन मालोकर, निवृत्ती वानखडे, बबलू पाटील वसू, अनिरुद भाजीपाले, डॉ. संतोष भिसे, गोपालराव गालट, मनोहर मांगटे पाटील, गोपाल पाटकर, बाळासाहेब लाहाळे, शाम कोल्हे, प्रवीण बानेकर, परिक्षीत बोचे, योगेश गोतमारे.

तसेच पंकज कौलखेडे, गणेश इंगळे, संजय घोगरे, बाबू पाटील, देवेंद्र मोहोकार, संतोष भोरे, सोनू गिरी, निखील श्रीनगर, अमोल हिंगणे, बबलु पाटील मांगटे, नितीन चव्हाण, वसंतराव पोहरे, बाळासाहेब भागवत, पंजाब भागवत, शैलेश भाकरे, संदीप वाकोडे, रितेश खुमकर, श्याम कुलट, चेतन लोखंडे, संदीप कुलट गजानन भारती, सूरज कावळे, बाळू बगाडे तसेच कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी राजेंच्या फोटोचे पूजन करून जयंती साजरी केली.

टॅग्स :Sambhaji RajeAkola