आरओ प्लांट समोर साचले पाण्याचे गटार 

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 6 July 2020

तेल्हारा तालुक्‍यातील गटग्रामपंचायत खेलदेशपांडे अंतर्गत येत असलेल्या उबारखेड येथील आरओ प्लांट समोर पाण्याचे मोठे गटार साचले आहे. गटार व घाणीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून, याकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

पंचगव्हाण (जि.अकोला) ः तेल्हारा तालुक्‍यातील गटग्रामपंचायत खेलदेशपांडे अंतर्गत येत असलेल्या उबारखेड येथील आरओ प्लांट समोर पाण्याचे मोठे गटार साचले आहे. गटार व घाणीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून, याकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

उबारखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला व आरओ प्लांटच्या समोर मोठे पाण्याचे गटार साचले आहे. गटारीला लागून गावात जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईन वर व्हॉल्व्ह लावलेला आहे. सदर पाणी व्हॉल्व्ह मधून पाईपमध्ये जाऊन नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात जावू शकते.

रस्त्यावर पाणी साचल्यामुळे व नाल्या साफसफाई नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा या कोरोनाच्या काळात डेंगू, मलेरिया साथीचे रोग सुद्धा पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन आरओ प्लांट समोर साचलेल्या पाण्याची व गावात अनेक ठिकाणी रस्त्यावर झालेल्या घाणीची विल्हेवाट लावावी व गावात स्वच्छता राबवावी अशी मागणी नागरिक करत आहेत. 

गावात साथीचे रोग पसरू नये यासाठी पावसाळा सुरू होण्या अगोदर ग्रामपंचायतला स्वच्छतेविषयी पत्र दिले आहे. याविषयी प्रत्यक्ष सरपंचांसोबत सुद्धा बोललो पण आहे. 
- डॉ. अनिल मल्ल, वैद्यकीय अधिकारी, पंचगव्हाण 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Sewage gutter in front of RO plant