
Akola : सेवालाल महाराज जन्मोत्सवी हजारो भाविक नतमस्तक
मानोरा : बहुजन समाज बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. विविध ठिकाणांवरून आलेल्या शेकडो भाविकांनी संत सेवालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत महाप्रसादाचा लाभ घेतला.
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे ८ फेब्रुवारीपासून जन्मोत्सव सोहळा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. १५ फेब्रुवारीला जन्मोत्सव सोहळानिमित्त गावातून पहाटेच्या सुमारास पालखी सोहळा काढून नगरप्रदक्षिणा घालण्यात आली.
यावेळी रस्त्यावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली. ठिकठिकाणी चहा, नाश्ता, पाणी तर वसंतनगर येथील मंदिरात भाविकातर्फे प्रसाद वाटप करण्यात आले. पालखी सोहळा आठ तास चालला. त्यानंतर पालखी मंदिरात पोहोचली.
तर एकच लाल सेवालाल या नाऱ्याने पोहरादेवी दुमदुमली यावेळी राजुदास महाराज, प्रा डॉ जगदीश राठोड यांनी पाळणा गीत सादर केले. संस्थानचे महंत कबिरदास महाराज यांनी भोग (भंडारा) अर्पण करून आरदास करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समितीचे विलास राठोड, प्रकाश राठोड, प्रा. डॉ जगदीश राठोड, कुंडलिक राठोड, उल्हास महाराज, खुशाल महाराज यांच्यासह मान्यवरांनी परिश्रम घेतले. राष्ट्रसंत डॉ रामरावबापू महाराज आश्रमात जन्मोत्सवराष्ट्रसंत डॉ रामरावबापू महाराज आश्रमात जगतगुरू संत सेवालाल महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नेहरू महाराज, यांनी पूजा विधी भोगभंडारा अर्पण करून आरदास म्हटले. यावेळी आश्रमतर्फे प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी महंत संजय महाराज, बलदेव महाराज, टी. आर. राठोड, राहुल महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
भक्तीधाम येथे विविध कार्यक्रम करण्यात आले. संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भोग लावण्यात आला. महंत जितेंद्र महाराज यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
दिग्रस व मानोरा ऑटो प्रवास मोफत
दिग्रस व मानोरा येथून श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकांसाठी गावातील ५८ ऑटोचालकांनी एक दिवस कोणतेही प्रवासी भाडे न आकारता मोफत सेवा दिली. यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. ऑटोचालकांचा कबीरदास महाराज यांनी फेटे बांधून सत्कार केला.
नामदेव महाराजांचे वारसदार म्हणून कबीरदास महाराज यांच्या नावाची घोषणा
श्री देवी सेवादास ट्रस्ट पोहरादेवी येथील मुख्य मंदिर सेवालाल महाराज व जगदंबा देवी मंदिर नामदेव महाराज व श्रीचंद महाराज यांच्या कुटुंबातील व्यक्तींना एक एक वर्ष आळी पाळीने वाटून दिले असून भाऊ बंदगीचा वाद कोर्टात सुरु आहे.
असे असले तरी संत ट्रस्टी नामदेव महाराज यांची प्रकृती बरी नसल्यामुळे उमरी, पोहरादेवी व वाईगौळ येथील भाविक भक्तांच्या साक्षीने ब्राम्हणांकडून वेद मंत्रोच्चारण व सर्व प्रक्रिया पूर्ण करीत संत ट्रस्ट्री नामदेव महाराज यांनी देविभक्त कबीरदास महाराज यांना भंडारा (टीका) लावून सर्वांच्या साक्षीने वारदार घोषित केले.
यावेळी दंडकडम देऊन हजारो भक्ताच्या साक्षीने जवाबदारी सोपविली यावेळी वाईगौळचे अनिल गजाधर राठोड, रविकांत राठोड, जयकिसन राठोड, भोला राठोड, पोहरादेवी महंत सुनील महाराज, जितेंद्र महाराज उमरीचे बलवंत राठोड, वसंतनगर सरपंच गणेश जाधव,
विलास राठोड, प्रकाश राठोड, प्रा डॉ जगदीश राठोड, जानुसिंग राठोड, कुंडलिक राठोड, ठेकेदार भिकासिंग चव्हाण, हापा महाराज, पुरा महाराज व बद्दू महाराज परिवारातील बहुतांश भाविक या कार्यक्रमास उपस्थित होती.