बाळापूर : वाळू तस्करी रोखण्यासाठी चार पथके

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार एका आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यावर अमलबजावणी करण्यात आली आहे.
वाळू पट्टा
वाळू पट्टाsakal

बाळापूर : अवैध वाळू तस्करी व वाहतूक रोखण्यासाठी तालुक्यातील चार महत्वाच्या ठिकाणी २४ तास महसूल पथकाची नेमणूक करण्यात आली असून, या पथकाद्वारे वाळू ठेक्यांवर लक्ष ठेवून वाळू तस्करी रोखण्यास मदत होणार आहे.

जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार एका आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यावर अमलबजावणी करण्यात आली आहे. शासनाच्या परवानगीआड शेगाव व बाळापुर तालुक्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी फोफावली आहे. शेगाव तालुक्यातील नदीपात्रातून राष्ट्रीय महामार्गावरून दिवसाढवळ्या वाहतूक सुरू आहे. अवैध वाळूची ही वाहतूक थांबविण्यासाठी तहसील स्तरावर पथके गठित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डि एल मुकुंदे यांनी दिली.

वाळू पट्टा
सातारा : 'ठोसेघरला वाघाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

याप्रकरणी बाळापूरचे आमदार नितीन देशमुखही आक्रमक झाले असून वाळू रोखण्यासाठी त्यांचाही प्रयत्न आहे. मध्य प्रदेशातूनही विनापरवाना वाळूची वाहने धावत आहेत, मात्र यामध्ये काही परवानगीप्राप्त वाहने आहेत, असे असले तरी यामध्ये वाळू तस्करांनी शेकडो टिप्पर वाळू वाहतूक विनापरवानगी चालविली आहे.

चार ठिकाणी २४ तास पथके

तालुक्यातील वाडेगाव, रिधोरा, निंबा फाटा व बाळापूर महामार्ग मदत केन्द्र येथे हि पथके कर्तव्य बजावत आहेत. शासकीय कामांकरिता वाळू वाहतुकीची परवानगी दिलेली वाहने वगळता अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्य वाहनाचा शोध घेऊन हि पथके कारवाई करणार आहेत. याकरिता वाडेगाव, चान्नी फाटा येथे विनोद पाचपोहे, रिधोरा बायपास जवळ योगेश कौटकर, बाळापूर बायपास वर नंदकिशोर कुमरे व निंबा फाटा येथे विजय सुरडकर या चार नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे. या पथकात प्रत्येकी अठरा कर्मचाऱ्यांचा सहभाग असून प्रत्येक गावातील तलाठी, ग्रामसेवक व कोतवालांचा यामध्ये सहभाग आहे.

वाळू पट्टा
पैठण : ट्रक, आयशर अपघातात एक जण ठार

वाळू तस्करी रोखण्यासाठी चार पथके कार्यरत आहेत. या पथकांसोबत रात्रीच्या वेळी पोलिसही राहणार आहेत. महामार्गावरुन धावणाऱ्या प्रत्येक वाळूच्या वाहनांवर हि पथके नजर ठेवणार आहेत. व परवाना नसल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

- डॉ. रामेश्वर पुरी, उपविभागीय अधिकारी, बाळापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com