सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांची फसवणूक, चौकशी करून तातडीने शेतकऱ्यांना मदतीची गरज

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 23 June 2020

सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतरही बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

अकोला : सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतरही बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली; परंतु सोयाबीनची उगवण क्षमता अनेक ठिकाणी कमी दिसून आली. त्यामुळे जवळपास ६० ते ७० टक्के सोयाबीन बियाण्याची उगवण झालीच नाही अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. एकीकडे शेतकरी संकटात असताना राज्य सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसताना शेतकऱ्यावर विशेषता विदर्भाच्या शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या प्रकरणी सरकारने चौकशी करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. बियाणे उगवले नसल्याच्या संदर्भात सर्व्हे करून संबंधित कंपन्यांवर सुद्धा कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.

यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी जिल्हा भाजपकडे केल्या असून, अकोला, वाशीम जिल्ह्यात विशेषता सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात होत असताना शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. राज्य शासनाने तातडीने सर्व्हे करून चौकशी करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा व पुन्हा प्रसंगी नव्याने पुनर्पेरणी खर्च देऊन नव्याने बी-बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रहाची मागणी राज्य शासनाकडे आमदार सावरकर यांनी केली आहे.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Soybeans never grew; Fraud of farmers, urgent need for help to farmers