अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी सत्ताधाऱ्यांची ‘फिल्डींग’  हालचालींना वेग; सर्व पक्षीय गट नेत्यांची बैठक लवकरच

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 24 June 2020

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी यांच्यावर दोषारोप करत वैयक्तिक टिप्पणी केल्याचे प्रकरण थेट पोलिसात पोहचले आहे. या प्रकरणी शिक्षण सभापतींविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कॅफोंवर कार्यवाहीसाठी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीकडून हालचालींना गती देण्यात आली आहे. त्याअंतर्गत सर्वच राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यासोबतच विभागीय आयुक्तांची भेट सुद्धा घेणार आहेत.

अकोला   ः जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी यांच्यावर दोषारोप करत वैयक्तिक टिप्पणी केल्याचे प्रकरण थेट पोलिसात पोहचले आहे. या प्रकरणी शिक्षण सभापतींविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कॅफोंवर कार्यवाहीसाठी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीकडून हालचालींना गती देण्यात आली आहे. त्याअंतर्गत सर्वच राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यासोबतच विभागीय आयुक्तांची भेट सुद्धा घेणार आहेत.

जिल्हा वार्षिक योजनेतून शाळा दुरूस्तीसाठी मिळालेला ११ कोटी ५० लाखांचा निधी मार्च महिन्यात शासलाना परत गेला. त्यामुळे निधी परत जाण्यासाठी शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) विद्या पवार यांना जबाबदार ठरविले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी कॅफोंवर वैयक्तिक स्वरुपात टिप्पणी केली हाेती. याला कॅफाे पवार यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर सीईओ सुभाष पवार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सभागृहातून बहिर्गमन केले होते. त्यामुळे कॅफोंसह सभेतून बहिर्गमन करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.

सत्ताधारी-विराेधकांमध्ये वाद वाढणार
शिक्षण समितीने शाळा दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव कॅफाे विद्या पवार यांच्याकडे पाठवला हाेता. परंतु कॅफोंनी सदर प्रस्तावाला मंजुरी दिली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाचे ११ कोटी ५० लाख रुपये परत गेले. या व्यतिरीक्त जिल्हा परिषदेचे कोरोनामुळे लावण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधामुळे ९७ कोटी रुपये शासन जमा झाले आहेत. या विषयावर विरोधक सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद वाढेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Speeding up the ‘fielding’ movements of the authorities to trap the authorities; All party group leaders meeting soon