
‘लालपरी’ रस्त्यावर पण गाव-खेड्यांपासून लांबच!
अकोला : गत पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे बंद असलेली एसटी आता हळूहळू रुळावर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपकरी एसटी कर्मचारी आता कामावर रुजू होत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस एसटी पूर्ण क्षमतेने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, ग्रामीण प्रवाशांची नाळ जुळलेल्या एसटीच्या एक-दोन फेऱ्या वगळता अनेक गाव-खेळ्यात ‘लालपरी’ पोहचलीच नसल्याने आणखी काही दिवस ग्रामीण एसटी प्रवाशांना ‘लालपरी’ची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर कामबंद आंदोलन चालू केले होते. या काळात अनेक कर्मचाऱ्यांवर एसटी प्रशासनाकडून निलंबन, बडतर्फ, बदलीच्या कारवाया करण्यात आल्या. कारवाई होत असल्याचे पाहून अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली होती. आपल्यावरही कारवाई होऊ नये यासाठी काही संपकरी कर्मचारी संपातून बाहेर निघून कामावर रुजू झाले होते.
यादरम्यान अनेक वेळा एसटी प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचा ‘अल्टिमेट’ देण्यात आला. परंतु, प्रकरण न्यायालयात चालू असल्याने संपकरी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम होते.
याकाळात एसटीला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटकाही सहन करावा लागला. शेवटी मुंबई उच्च न्यायालयानेच संपकऱ्यांना ता. २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा आदेश दिला. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची कामवार रुजू करून घेण्यासाठी धावपळ झाली. कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने आगारातील एसटींचीही संख्या वाढत गेली. अनेक ठिकाणी एसटीच्या फेऱ्याही पूर्ण क्षमतेने चालू झाल्या. परंतु, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी अजून लालपरी पोहचलीच नसल्याने एसटीशी नाळ जुळेल्या ग्रामीण भागातील एसटी प्रवाशांना खासगी वाहननांचाच आधार घ्यावा लागत आहे. अशावेळी त्यांना आर्थि भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
आगार एकमधून पाच बसेस सुरू
स्थानिक आगार एकमधून आतापर्यंत ३० बसेस पूर्वीप्रमाणे धावत आहेत. यापैकी पाच गाड्या ग्रामीण भागासाठी नियमित सोडण्यात आल्याची माहिती आहे. उर्वरित बसेसही लवकर सोडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आगार दोनमधून मात्र ग्रामीण भागासाठी एसटी सोडण्यात आल्या नाहीत.
गत पाच महिन्यांंपासून एसटीची आतूरतेने वाट पाहत आहे. हळूहळू एसटी चालू करवी जणे करून प्रवाशांना अडचण होणार नाही. खासगी वाहनधारकांकडून आर्थिक लूट होत आहे.
- गुणवंता धांडे, प्रवासी.
Web Title: Akola St Bus Start But Not From Small Village
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..