Akola: शासनाचा निर्णय म्हणजे लॉलीपॉप; संपाची कोंडी कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Worker Strike
शासनाचा निर्णय म्हणजे लॉलीपॉप!

शासनाचा निर्णय म्हणजे लॉलीपॉप; संपाची कोंडी कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली वेतन वाढ म्हणजे कर्मचाऱ्यांना दिलेला लॉलीपॉप आहे. त्यामुळे या निर्णयाचा कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष लॉलीपॉप वाटून अकोला बस स्थानकावर निषेध नोंदविला. विलिकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धारही यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतला.

राज्यातील एसटी कर्मचारी महिनाभरापासून सुटीवर आहेत. अकोला विभागातील अकोला व वाशीम जिल्ह्यातील कर्मचारीही ता. २७ ऑक्टोबरपासून संपात सहभागी झाले आहेत. या संपाची कोंडी फोडण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी ता. २४ नोव्हेंबर रोजी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीची घोषणा केली. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे एसटी कर्मचाऱ्यांची विलनिकरणाची मागणी मान्य करता येणार नाही, अशी भूमिका घेतली. संपकरी कर्मचारी मात्र वेतन वाढ नव्हे तर विलनिकरणावर अडून बसले आहेत. त्यांनी शासन निर्णय स्वीकारण्यास नकार देत गुरुवारीसुद्धा संप सुरूच ठेवला. शासनाच्या निर्णयाचा अकोला बस स्थानकावर कर्मचाऱ्यांनी लॉलीपॉप वाटून निषेध केला. यावेळी संपात सहभागी झालेले सर्वच कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

कर्मचाऱ्यांमध्ये फुट पाडण्यात अपयश एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची कोंडी फोडण्यासाठी शासनाने नवीन कर्मचाऱ्यांना सर्वाधिक वेतन वाढ देवून संपात सहभागी कर्मचाऱ्यांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी शासनाचा निर्णयच धुडकावून लावत कर्मचाऱ्यांमध्ये फुट पाडण्याचा केलेला प्रयत्न हानून पाडल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला. शुक्रवारी सकाळपर्यंत रुजू होण्याचे आवाहन शासनाने केले आहे. त्यामुळे शुक्रवारी किती कर्मचारी कामावर रुजू होतात याकडे लक्ष लागले आहे.

loading image
go to top