अकोला : अवैध धंदे बंद करण्यासाठी महिला धडकल्या पोलिस स्टेशनवर

कार्यवाही करण्याचे ठाणेदारांचे आश्‍वासन
police station
police station

बार्शीटाकळी : आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, हनुमान जन्मउत्सव, श्रीरामनवमी आदी सण-उत्साह येत असून, या काळात शांतता सुव्यवस्था आबाधीत राहण्याच्या दृष्टीने गावात वादविवाद होऊ नये यासाठी गावातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी पिंजर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निहिदा गावातील महिलांनी पोलिस स्टेशनवर धडक देऊन ठाणेदार याबाबत निवेदन दिले. यावेळे ठाणेदार वाढवे यांनी गावातील अवैध धंदे १०० टक्के बंद करून संबंधितांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

पिंजर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निहिदा गावासह पिंजर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. अनेक गावात देशी, विदेशी, गावठी दारूची सर्रास विक्री होत असल्यामुळे गावात शुल्लक कारणांवरून दररोजचे वाद-विवाद होत आहेत.

दिवसभर शेतात काम करून घरी गेल्यानंतर पती-पत्नीचे वाद होऊन महिलांना दारू पिणाऱ्या पतीकडून विनाकारण मार खावा लागतो, अशीच स्थिती गावातील अनेक महिलांची असल्यामुळे आणि निहिदा गावातील कायदा व सुव्यस्था कमालीची बिघडत चालल्यामुळे संतप्त ३० महिलांनी शुक्रवारी (ता.८) दुपारी पिंजर पोलिस स्टेशनवर धडक देऊन ठाणेदार वाढवे यांना गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. निवेदनावर प्रमिला महल्ले, लिला घरबुडवे, मायावती प्रधान, प्रतिभा आठवले, सिंधू ठाकरे, वर्षा कराळे, तारा इंगोले, नर्मदा वानखडे, सविता प्रधान, मेघा ठाकरे, कांता वानखडे, शोभा सावळे इत्यादी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com