स्वाभिमानीची स्टेट बँकेत धडक, शाखा व्यवस्थापकांना घेराव

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 1 July 2020

सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. बॕंकाकडून पीककर्जाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी बघता त्या सोडविण्यासाठी व तातडीने पिककर्ज मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात जानेफळ येथील स्टेट बँकेच्या मॅनेजरला घेराव घालून शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज वाटप करण्यासंदर्भात सूचना केल्या

मेहकर (जि.बुलडाणा) ः सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. बॕंकाकडून पीककर्जाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी बघता त्या सोडविण्यासाठी व तातडीने पिककर्ज मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात जानेफळ येथील स्टेट बँकेच्या मॅनेजरला घेराव घालून शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज वाटप करण्यासंदर्भात सूचना केल्या.

जिल्ह्यामध्ये प्रत्येक बँकांमध्ये जाऊन ‘ऑन द स्पॉट’ तक्रारी व प्रकरणे मार्गी लावण्याचे काम रविकांत तुपकर करीत आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी ३० जुन रोजी मेहकर तालुक्यातील जानेफळ भारतीय स्टेट बँक येथे धडक देऊन शाखाव्यवस्थापक यांच्याकडून पिककर्जाची माहीती घेतली व शेतकऱ्यांना नविन पिककर्ज मिळत नव्हते ते तात्काळ चालु केले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शेतकऱ्यांच्या पिककर्जाच्या अडचणी सोडविल्या. नविन फाईल दिल्या त्यांचे पिककर्ज अजुनपर्यंत का दिले नाही असा आक्रमक पवित्रा घेऊन जाब विचारला. यावेळी त्यांच्याबरोबर चर्चाअंती सदर प्रश्नी मार्गी लागला. यावेळी जिल्हाअध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्यासह जिल्हाउपाध्यक्ष अनिल बोरकर, प्रफुल्ल देशमुख, नितीन अग्रवाल, गोपाल सुरडकर, अमोल धोटे, गणेश जुनघरे, कैलास ऊतपुरे, देवाभाऊ आखाडे, सुरेश खरात, भीमराव खरात, संदीप लाड, दीपक जावळे, श्याम जाधव, सुरेश ढोणे, खाडे मामा, गौतम सदावर्ते, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Swabhimani's attack on State Bank, siege of branch managers