अकोला : चार वर्षांत दोन रस्‍त्याचे १३ टक्के काम!

भाजप आमदारांचा बांधकाम विभागात ठिय्या; तेल्हारा-अकाेट तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट
Akola Telhara Akot bad road conditions 13% work two roads in four years
Akola Telhara Akot bad road conditions 13% work two roads in four yearssakal

अकोला : अकाेट-तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची कामे चार वर्षांत १३ टक्केच झाली. वारंवार बैठका घेवूनही तोडगा निघाला नाही. रस्त्याबाबत अहवाल देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप आमदारांनी सोमवारी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांचे गौरक्षण रोडवरील कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलक आमदारांनी रस्त्याच्या गंभीर प्रश्नावरून अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले.

अकाेट विधानसभा मतदारसंघातील आडसूळ-तेल्हारा-माळेगाव-वरवटबकाल व झरीबाजार-हिवरखेड-तेल्हारा-घाेडेगाव-वणी वारुळा हे दाेन रस्ते चार वर्षांपूर्वी मंजूर झाले हाेते. नागपूर येथील कन्स्ट्रक्शन कंपनीकडून हे कंत्राट घेण्यात आले होते.

चार वर्षांत एकाही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. रस्ते मात्र खोदून ठेवले. यासाठी अनेकदा आंदाेलनेही झाली. प्राणांतिक उपोषणही तेल्हारा व अकोट तालुक्यातील नागरिकांनी केले. अधीक्षक अभियंता गिरीष जोशी असताना यासंदर्भात बैठका घेण्यात आल्यात. मात्र, त्याचे अहवालच शासनाकडे पाठविले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

त्यामुळे साेमवारी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसकाळे, आमदार गाेवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह भाजप कार्यकर्ते व अकाेट-तेल्हारा तालुक्यातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदाेलन केले. आंदाेलनात , प्रभाकर मानकर, कनक कोटक, राजू नागमोते, गजानन उंबरकार, महेंद्र गोयंका अशोक गावंडे गिरीश जोशी अादी सहभागी झाले. यावेळी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करण्यात आली.

इशाऱ्याकडे केले दुर्लक्ष

जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांच्या मुद्दावरून नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर ता.२१ मे राेजी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी प्रादेशिक मंडळाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र दिले हाेते. यात त्यांनी साेमवारी आंदाेलन करण्याचा इशाराही दिला होता. या इशाऱ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com