अकाेला : तीन दिवसांत रस्त्यांच्या कामाला होणार सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Telhara taluka Road construction start in three days

अकाेला : तीन दिवसांत रस्त्यांच्या कामाला होणार सुरुवात

तेल्हारा : तालुक्यातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या पुढाकाराने ता.८ जून रोजी मुंबई येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये तीन दिवसांमध्ये तेल्हारा ते बेलखेड, हिवरखेड या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश राज्याचे राज्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर दिले, त्यामुळे तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची कामे तीन दिवसात सुरू होतील. तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची झालेल्या दयनीय अवस्थेबाबत तालुक्यातील अनेक संघटना, पक्ष, एवढेच नव्हे तर नागरिकांनीही रस्त्यावर उतरून आंदोलने केली, बेमुदत उपोषण, बंद पुकारले, मात्र रस्त्याची स्थिती सुधारली नाही.

रस्त्याच्या कामाला सुरुवातही झाली नाही, मात्र ता. ८ जून रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी, प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्यमंत्र्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची कामे तीन दिवसात सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामध्ये तेल्हारा, बेलखेड हा रस्ता प्राधान्याने १५ दिवसाच्या आत पूर्ण करून ता. ३१ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये काम पूर्ण करण्याचे सांगितले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसातच बेलखेड ते तेल्हारा रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून, इतर कामाचा पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण होऊन दिवाळीपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले.

Web Title: Akola Telhara Taluka Road Construction Start In Three Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top