esakal | Akola : धार्मिकस्थळे गुरुवारी तर ज्ञानमंदिरे आजपासून सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola : धार्मिकस्थळे गुरुवारी तर ज्ञानमंदिरे आजपासून सुरू

Akola : धार्मिकस्थळे गुरुवारी तर ज्ञानमंदिरे आजपासून सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेल्या शाळा सोमवार (ता. ४) पासून सुरू होणार आहेत, तर धार्मिक व प्रार्थना स्थळे गुरूवार (ता. ७) पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट तर मंदिरांमध्ये भक्तांना आराधणा, पूजा करण्यास शासनासह जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकहा शाळा विद्यार्थ्यांनी तर मंदिरे भक्तांनी फुलून जातील. महाविद्यालयांना मात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षाच आहे.

प्रार्थनास्थळांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला हिरवा कंदील

जिल्ह्यातील धार्मिक व प्रार्थना स्थळे उघण्याच्या संदर्भात आरोग्‍य विभागाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्यानुसार कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे अवलंब करुन तसेच निश्चित करण्‍यात आलेल्‍या मानक कार्यपध्‍दतीचा अवलंब करुन जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील धार्मिक स्‍थळे, प्रार्थना व पूजास्‍थळे गुरुवार (ता. ७) पासून उघडणाचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. त्यानुसार मास्‍क परिधान केलेल्‍या व्यक्तींना मंदिरात प्रवेश देण्‍यात येईल, पुतळे, पवित्र पुस्तके इत्यादींना स्पर्श करता येणार नाही. कोविड-१९ च्या संक्रमणाचा संभाव्‍य प्रसार होण्याचा धोका लक्षात घेता भक्ती संगीत, गाणी वाजविली जाऊ शकतात. गायक-गायिका किंवा गायन गटांना परवानगी राहणार नाही. धार्मिक स्थळाच्या आत प्रसाद, वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडण्‍यास परवानगी राहणार नाही. धार्मिक स्‍थळामध्‍ये काम करणारे कर्मचारी, कामगार यांनी आठवडयातून एक वेळेस कोविड-१९ ची चाचणी करावी लागेल.

ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात कमी असल्यामुळे जिल्ह्यात यापूर्वी इयत्ता ८ ते १२ वी पर्यंत ग्रामीण भागातील ३७१ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु संबंधित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी असल्याने ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पर्यायाद्वारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. दरम्यान आता साेमवार (ता. ४) पासून ग्रामीण भागात वर्ग ५ ते १२ तर शहरी भागात वर्ग ८ ते १२ च्या शाळा सुरू करण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे सोमवारपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट दिसून येईल. परंतु शिक्षकांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे लागेल.

अशी आहे शाळांची संख्या

१ हजार ३१४

प्राथमिक शाळा

२९५

माध्यमिक शाळा

२६०

उच्च माध्यमिक

१८६९

वर्ग ५ ते १२ वीचे विद्यार्थी

इयत्ता विद्यार्थी

पाचवी २९,७२९

सहावी २९,४३८

सातवी २९,३४०

आठवी २८,५९५

नववी २८,७५०

दहावी ३०,१७८

अकरावी २५,८३३

बारावी २२,८८९

एकूण २,२४,७५२

loading image
go to top