अकोला : कोविड बळींच्या पाल्यांना दहा लाखांची मुदतठेव

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन; पोस्ट पासबुकचे वितरण
Akola Ten lakh term deposit children of covid victims
Akola Ten lakh term deposit children of covid victimssakal

अकोला : पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेचा शुभारंभ नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोविड संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना, त्यांच्या पालनकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्ह्यातील पाच अनाथ बालकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या मुदतठेवीचे पासबुक, प्रधानमंत्री मोदी यांचे स्नेहपत्र, हेल्थकार्डचे वितरण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित या सोहळ्याला जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल न्याय मंडळचे ॲड. वैशाली गावंडे, ॲड. सारिका घिरणीकर, बाल कल्याण समितीचे सदस्य अविनाश मुधोळकर, जिल्हा संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर, चाईल्ड लाईनच्या समन्वयक हर्षाली गजभिये, संरक्षण अधिकारी सुनील सरकटे, सुनील लाडूलकर, सामाजिक कार्यकता सतीश राठोड, रेवत खाडे, संगीता अभ्यंकर आदी उपस्थित होते.

१८ वर्षानंतर मिळणार रक्कम

पीएम केअर फॉर चिल्ड्रन निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये मुदतठेवीचे पोस्टाचे पासबुक देण्यात आले. हे पासबुक बालक आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त नावाने आहे. खात्यामध्ये बालकांच्या वयानुसार त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे. ही रक्कम त्यांना वयाचे १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत या पाच बालकांचा प्रत्येकी पाच लक्ष रुपयांचा आरोग्य विमा काढून त्या बालकांना आरोग्य विमा कार्डचे वितरण करण्यात आले. या विम्याचा हप्ता पीएम केअर फंडातून भरण्यात येणार असून या कार्डवर पाच लाखपर्यंत मुक्त उपचार मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com