बाळापूर येथे घशातील स्त्राव संकलन केंद्र सुरू

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 3 July 2020

बाळापूर शहरात संदिग्ध व जोखमीच्या नागरिकांची (ज्येष्ठ व अन्य आजार असणारे) कोरोना चाचणी करता यावी यासाठी घशातील स्त्राव नमुने संकलन केंद्र सुविधा शहरातील खतीब हॉल येथे करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी दिली आहे.

अकोला  ः बाळापूर शहरात संदिग्ध व जोखमीच्या नागरिकांची (ज्येष्ठ व अन्य आजार असणारे) कोरोना चाचणी करता यावी यासाठी घशातील स्त्राव नमुने संकलन केंद्र सुविधा शहरातील खतीब हॉल येथे करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळापूर येथे सर्व नागरिकांचा आरोग्य तपासणी सर्व्हे झाल्यानंतर विविध आजार असलेले ३१२ नागरिक व जोखमीचे ६४७ नागरिक असे एकूण ९५९ नागरिकांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बाळापूर शहरातील ज्या भागात जास्त रुग्ण आढळले आहेत अशा प्रतिबंधित भागात लोकांनी आपली लक्षणे लपवून न ठेवता स्वतःची चाचणी करुन घ्यावी, यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

प्रतिबंधित झोनमधील व त्या झोनला लागून असलेल्या भागातील जोखमीचे असलेले ६० वर्षावरील नागरिक व इतर आजार असलेल्या नागरिकांना आपले नमुने चाचणीसाठी देता यावे यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या सूचनेनुसार बाळापूर शहरातील खतीब हॉल येथे व्यवस्था करण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी नऊ नागरिकांनी स्वतःचे नमुने दिले आहेत. आज असला तरी सकाळी १० वाजेपासून हे केंद्र सुरु राहणार आहे. शहरातील प्रतिबंधित भागातील नागरिकांनी स्वतःचे नमुने द्यावेत असे आवाहन तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Throat secretion collection center started at Balapur