अकाेला : विदर्भ ट्रेडर्सवर छापा प्रतिबंधित गुटखा जप्त

उरळ पोलिसांची कारवाई
Akola Ural police seized banned gutka on grocery traders
Akola Ural police seized banned gutka on grocery traderssakal

बाळापूर : तालुक्यातील निंबा येथील विदर्भ किराणा ट्रेडर्सवर छापा टाकत नऊ हजार रुपयांचा गुटखा प्रतिबंधित गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. उरळ पोलिसांनी सदर कारवाई केली आहे. पोलिसांनी १४ मे रोजी मध्यरात्री केलेल्या या कारवाईत गुटखा व सुगंधित सुपारी जप्त करण्यात आली.

उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निंबा येथील विदर्भ किराणा ट्रेडर्स येथे अवैध गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती १४ मे रोजी उरळ ठाणेदार अनंतराव वडतकार यांना मिळाल्याने त्यांनी निंबा गावाकडे एक पथक रवाना केले. पोलिसांनी वरील किराणा ट्रेडर्सवर छापा टाकत ट्रेडर्सची झाडाझडती घेतली. यावेळी आरोपी किराणा मालक शेख जिलानी शेख सत्तार (वय ५०, रा.निंबा) याच्या ताब्यातून वाह पान मसाला, गुटख्याचे पाच पाकीट, पान बहार गुटख्याचे निळे पाकीट पाच नग, विमल पान मसाल्याचे निळे पाकीट २५ नग, विमल पान मसाला हिरवे पाकीट १५ नग, असा एकूण ९ हजार ६५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केला.

शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक तंबाखूजन्य सुगंधित गुटखा, पान मसाला पदार्थ स्वतःच्या आर्थिक फायदा करिता आरोपीने विक्री करीता जवळ बाळगल्याने आरोपी विरुद्ध उरळ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सागर गोमासे, मोरे, पोलिस हवालदार संतोष भोजने, शैलेश घुगे, पंजाबराव इंगळे, महिला अंमलदार मनीषा इंगळे यांनी सदर कार्यवाही केली. आरोपीस अटक करून पुढील तपास पीएसआय सागर गोमासे हे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com