अकाेला : गावखेड्यावर लालपरी रूसलेलीच

एसटी सेवा पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी
Akola village side Citizens demand good of ST services
Akola village side Citizens demand good of ST servicessakal

जउळका : आधी कोरोना, नंतर एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस गाव-खेड्यांमध्ये बंदच होत्या. गत दीड-दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतरही अकोला जउळका खेडेगावात लालपरी अजून पोहोचलीच नाही. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांसह नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे या बसेस चालू करण्याची मागणी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे मुक्कामी असलेल्या अकोला आगाराची बस सेवा गत दोन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे जउळका रेल्वे वडी धमधमी अमाना मुसळवाडी कुत्तरडोह धरमवाडी मालेगाव साखरवीरा येथील विद्यार्थ्यांची बाहेरगावी शिक्षणासाठी व नागरिकांची विविध कामांसाठी फरपट सुरू आहे. त्यामुळे अकोला, आगार व्यवस्थापकांनी गावखेड्यातील बसेस त्वरीत सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे. जउळकासह आदिवासी डोंगराळ भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी अकोलासह इतर ठिकाणी जात असतात.

जवळपास दोन वर्षापासून आदिवासी डोंगराळ भागात ''लालपरी'' फिरकली नसल्याने विद्यार्थी व नागरिकांना नाईलाजाने खासगी वाहनाचा सहारा घ्यावा लागतो. यासाठी त्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे, हेही विशेष. तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे असले तर खाजगी वाहन जोपर्यंत पूर्णपणे भरत नाही तोपर्यंत वाहनचालक आपले वाहन हलवत नाहीत, त्यामुळे प्रवाशांना वाहन भरेपर्यंत ताटकळत बसावे लागते. वेळ वाया जातो व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो व आर्थिक नुकसान सोसावे लागते. आता खरिपाचा हंगाम सुरू होणार असल्याने बस चालू करावी. शेतकऱ्यांनाही वेळोवेळी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यांनाही आर्थिक फटका बसू नये यासाठी गाव खेड्यात बस चालू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे गाव समृद्धी महामार्ग लगत असून पंचेचाळीस खेड्यांचा केंद्रबिंदू आहे. कमी अंतराच्या अकोला वाशीम जिल्ह्याला जोडणाऱ्या मार्गावर मागील दोन वर्षापासून अकोला जउळका मुक्कामी एसटी बस सेवा बंद असल्याने या मार्गालगत असलेल्या अनेक गाव खेड्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून जेष्ठ नागरिक व शेतकऱ्यांना व दिव्यांगांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो, त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. अकोला आगार व्यवस्थापकांनी त्वरित लक्ष देऊन अकोला - जउळका बस फेरी पूर्ववत चालू करावी.

-नंदकिशोर लढा (जिल्हाध्यक्ष) राष्ट्रवादी अपंग सेल वाशीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com