खबरदार! पिकविम्याची हयगय कारवाईला आमंत्रण, जिल्हाधिकाऱ्यांचे बॅंकांना निर्देश: सामूहिक सुविधा केंद्र राहणार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू

Akola Washim invites crop insurance action, District Collector instructs banks: Collective facility center to remain open till 10 pm
Akola Washim invites crop insurance action, District Collector instructs banks: Collective facility center to remain open till 10 pm

वाशीम : शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी काही बॅंका टाळाटाळ करीत आहेत. शासकिय वेळापत्रकाचा हवाला देत दुपारी 2 नंतर विमाहप्ता स्वीकारल्या जात नव्हता. याची दखल घेत जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी विमा हप्ता भरण्यास बॅंकांनी दिरंगाई केल्यास प्रशासकिय कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बॅंकांचा विमा हप्ता भरण्याचा कालावधी वाढविण्यात आला असून, ग्रामीण भागातील सेतू सुविधा केंद्र रात्री 10 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा दिली आहे.


जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1लाख 50 हजार 118 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये विमा हप्ता भरला आहे. मात्र या योजनेची मुदत 31 जुलैपर्यंतच असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी बॅंकांमध्ये ठरलेल्या वेळात विमाहप्ता भरणे कठिण जात होते. ही परिस्थीती लक्षात घेत जिल्हाधिकारी यांनी बॅंकांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पिक विम्याचा हप्ता स्विकारण्याची मुदत दिली आहे. ग्रामीण व शहरी भागात असलेल्या सेतू सुविधा केंद्रामध्ये कोरोनाच्या संचारबंदीच्या विमामध्ये दुपारी 2 वाजेपर्यंतच विमाहप्ता स्वीकारला जात होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व सुविधा केंद्र रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

पिकाचे नाव विमा संरक्षित शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता
रक्कम रु.(प्रति हेक्‍टर)
सोयाबीन 45,000/- 900/-
कापूस 43,000/- 2150/-
तूर 31,500/- 630/-
मुग व उडीद 19,000/- 380/-
खरीप ज्वारी 25,000/- 500

बिगर कर्जदार शेतकरीही भरू शकतात विमाहप्ता
कर्जदार शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव संबधित बॅंकेमार्फत सादर करता येतो. मात्र, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा बॅंकेमार्फत विमा हप्ता सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार विमा योजनेत सहभागी असलेले शेतकरी त्यांचे बचत खाते ज्या बॅंकेत आहे, त्या बॅंकेमध्ये आपला पीक विमा हप्ता जुलै पर्यंत सादर करू शकतील. गावांमध्ये महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सुविधा केंद्र कार्यान्वित नसल्यास अथवा विमा पोर्टल बंद असल्यास शेतकऱ्यांना बॅंकेत विमा हप्ता सादर करता येणार आहे. मात्र, सदर बॅंकेत संबंधित शेतकऱ्याचे बचत खाते असणे बंधनकारक आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com