esakal | एक महिना होउन ही मुख्याध्यापक बेपत्ताच!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Washim News The headmaster has been missing for a month!

तालुक्यातील ढोनी (पाळोदी) येथील रहिवासी व पोहरादेवी येथील एका विना अनुदानित शाळेत कार्यरत असणारे शिक्षक (प्रभारी मुख्याध्यापक) दिनेश अज्ञानसिंग साबळे हे २४ जुलै २०२० पासून बेपत्ता आहेत. याला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरी, आसेगाव पोलिसांच्या तपासाला गती मिळाली नाही.

एक महिना होउन ही मुख्याध्यापक बेपत्ताच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मानोरा (जि.वाशीम)/ अकोला ः तालुक्यातील ढोनी (पाळोदी) येथील रहिवासी व पोहरादेवी येथील एका विना अनुदानित शाळेत कार्यरत असणारे शिक्षक (प्रभारी मुख्याध्यापक) दिनेश अज्ञानसिंग साबळे हे २४ जुलै २०२० पासून बेपत्ता आहेत. याला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरी, आसेगाव पोलिसांच्या तपासाला गती मिळाली नाही.

त्यामुळे पोलिस अपयशी ठरले आहेत, असा आरोप साबळे यांचे कुटुंबाने केला आहे. याबाबात त्यांनी पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन तपास अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- या सापाच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नाही येणार, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड असण्याचं कारण तरी काय?.


२४ जुलै रोजी शिक्षक साबळे मानोरा पंचायत समितीला जातो म्हणून घरून निघून गेले. आजपर्यंत घरी आले नाही. पोहरादेवी येथील एका संत जगदगुरू सेवालाल महाराज विनाअनुदानित प्राथमिक मराठी शाळा येथे साबळे चार वर्षांपासून कार्यरत होते. त्यांचेकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार होता.

बापरे! जिल्हा परिषदेचे सहा अधिकारी, कर्मचारी क्वारंटाईन

शासनाने शाळेला अनुदान, बिनपगारी शिक्षकाचा उदरनिर्वाह कसा करावा, मुलाचे शिक्षण कसे करावे, वृद्ध आई वडिलांची सेवा कशी करावी, या चिंतेत काही केले नाही असे अनेक प्रश्न उपस्थित आहे. त्यामुळे ते अर्थिक विवंचनेत होते, असे त्यांचे वडिलांनी सांगितले.

बँकेला अंधारात ठेवून विकल्या शेळ्या, कर्ज घेतल्यानंतर १९ लाखांने फसवणूक

या शिक्षकाची मोटर सायकल उमरी येथील चौकात रोडवर उभी आढळली होती. त्यांच्या फोनचे डिटेल घेतले आहे. परंतु तपासाला चालना मिळाली नाही. हा घातपात तर नाही ना? अशी शंका आता यायला लागली आहे.

ढोनी यथील दिनेश साबळे हे मिसिंग झाल्याची तक्रार आसेगाव पोलिस स्टेशनला मिळाली आहे. याचा तपास जमादार रमेश चव्हाण यांचेकडे दिला आहे. तपास सुरू आहे. अद्याप काही हाती लागले नाही. लवकरच काही माहिती हाती येईल.
- शिवाजी लश्करे, पोलिस निरीक्षक, असेगाव पोलिस स्टेशन
(संपादन - विवेक मेतकर)