नांगराच्या तासात मिळालेली नागरतास येथील जगदंबा

Akola Washim News: Jagdamba at Nagartas found in plow hour
Akola Washim News: Jagdamba at Nagartas found in plow hour

मालेगाव (जि.वाशीम) : तालुक्यातील नागरतास येथील जगदंबा देवीची मूर्ती शेत नांगरताना नांगराच्या तासामध्ये मिळालेली असून, ती स्वयंभू असल्याचे भाविक सांगतात.


नागपूर-जालना-मुंबई राज्यमहामार्गालगत मालेगाव शहारापासून दोन कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे. ३५० वर्षापूर्वी शेत नांगरताना दशरूजी घुमशे यांना देवीची मूर्ती मिळाली. त्यांनी गावाच्या ईशान्येला मंदिर बांधून त्यामध्ये मूर्तिची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी श्री क्षेत्र तुळजापुर येथून श्री तुळजाभवानी देवीची व श्री क्षेत्र माहूर येथून श्री रेणुका देवीची मूर्ती आणली. मंदिरे बांधून त्यामध्ये त्यांची स्थापना केली. ही मंदिरे पूर्वाभिमूख आहेत.

मंदिरासमोर दीपमाळ व यज्ञमंडप आहे. मंदिरालगत आसरामाता, श्री गणेश, श्री हनुमान, श्री इसामाता यांची मंदिरे आहेत. मंदिरालगत विहीर आहे. संस्थान परिसरात तत्कालीन आमदार विजय जाधव तसेच विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या निधीमधून बांधण्यात आलेली सभागृहे आहेत. सुधाकर देवळे यानी पं.स. सदस्य असताना सुचविलेले व तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधलेले शॉपिंग कॉम्पलेक्स येथे आहे.

संस्थान परिसरात आकर्षक बगीचा तयार करण्यात आला आहे. सुभाषराव झनक यांच्या स्थानिक विकास निधीमधून येथे स्वच्छतागृह बांधण्यात आलेले आहे. मंदिरालगत काटेपूर्णा नदी आहे. संस्थानवर शारदीय व चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये देवी भागवत, श्री हरिकीर्तन, देवीची जन्मकथा यांचा समावेश असतो. राज्यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.


संस्थान परिसरात श्री विठ्ठल-रुख्मिनीचे भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे. त्यासमोर सभामंडप बांधण्यात येणार असून, भाविकांना जगदंबेसोबत श्री विठ्ठल-रुख्मिनीचे दर्शन घेता येईल.
- सुधाकर देवळे महाराज

नागरतास येथून ही संस्थाने आहेत जवळ
नागरतास येथून श्री नाथनंगे महाराज संस्थान दोन कि.मी. अंतरावर आहे. जैनांची काशी शिरपूर जैन दहा कि.मी. अंतरावर, जउलका रेल्वे स्टेशन सात कि.मी. तर, वाशीम हे जिल्ह्याचे ठिकाण २२ कि.मी. अंतरावर आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com