दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले, तुमच्याकडे कसा आहे पाऊस?

Akola Weather News It rained for the second day in a row
Akola Weather News It rained for the second day in a row

अकोला : सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावत पिकांचे नुकसान केले आहे. प्रामुख्याने तेल्हारा व अकोट तालुक्यात जोरदार पावसाने झोडपून काढल्याने गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे.


आठवडाभरापासून वातावरणात बदल दिसून येत होता. शिवाय हवामान विभागाने सुद्धा १७, १८ फेब्रुवारीसह पुढील दोन आठवडे गारपिठीसह वादळी पावसाचे संकेत दिले होते. त्यानुसार बुधवारी (ता.१७) अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामध्ये अकोट, तेल्हारा, पातूर, अकोला, बार्शीटाकळी तालुक्यात सरी कोसळल्या.

मात्र, तेल्हारा तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहाला शिवाय तालुक्यातील काही भागात गारपीठ सुद्धा झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सुद्धा तेल्हारा, अकोट तालुक्यात जोरदार पाऊस पडला. अकोला, बार्शीटाकळी तालुक्यातही काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. मात्र अकोट व तेल्हारा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढीत गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान केले.

हेही वाचा - 

येथे पिकाचे मोठे नुकसान
सलग दोन दिवस अवकाळी पाऊस व गारपिठीने तेल्हारा व अकोट तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान केले. त्यामध्ये हिवरखेड, दाणापूर, बोर्डी, तरोडा, तळेगाव डवला, वरुड, वडनेर, बाभुळगाव येथे गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - धोका वाढला; रविवारी संपूर्ण दिवसभर तर दररोज रात्रीची संचारबंदी

जिल्ह्यात वातावरण ढगाळलेले
अवकाळी पावसाने प्रामुख्याने तेल्हारा, अकोट तालुक्यात हजेरी लावली असली तरी, जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही भागात पहाटे तुरळक पावसाच्या सरी सुद्धा कोसळल्या.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com