
भारतीय हवामान विज्ञान संस्थेच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या संदेशानुसार अकोला जिल्ह्यात दि.१६ ते १८ दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
अकोला: तेल्हारा तालुक्यात बुधवारी सकाळी आलेल्या पावसामुळे तालुक्यातील तळेगाव डवला, वरुड, वडनेर, तळेगाव, बाभुळगाव, या सह तालुक्यातील बऱ्याच गावात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यात बुधवारी सकाळी आलेल्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांशी गावात हरबरा सोगंणि चालू आहे तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा बियाणे कांदा लागवड केलेला आहे.
हेही वाचा - धोका वाढला; शाळा, शिकवणी २८ फेब्रुवारीपर्यंत बंद
दरम्यान भारतीय हवामान विज्ञान संस्थेच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या संदेशानुसार अकोला जिल्ह्यात दि.१६ ते १८ दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या कालावधीत मेघ गर्जना व विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तरी याबाबत गावपातळीवरील नागरिकांना आवश्यक खबरदारी व दक्षता घेण्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
गावात अचानक आलेल्या पावसामुळे हरबरा कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत तरी शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
संपादन - विवेक मेतकर
अधिक वाचा -
भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर
तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही
बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू