अकाेला : पावसामुळे शेतीला आले तलावाचे स्वरूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola weather update

अकाेला : पावसामुळे शेतीला आले तलावाचे स्वरूप

कुरणखेड - कुरणखेडसह परिसरात गत काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे परिसताली पिके धोक्यात आली आहेत. शेतात परिसारीतल नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने शेताला तलावाचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे शेतात ताणाचा जोर वाढत असून, डवरे सुद्धा चालत नसल्यामुळे पिकापेक्षा तण वाढल्याचे दिसून येत आहे.

जलमय वातावरणात निंदण कसे व केव्हा करायचे? अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. दिवसरात्र सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचा जीव आता कासावीस व्हायला लागला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे अनेक शेतातील पिके पाण्यामुळे सडू लागली आहेत. इतरही पिके धोक्यात आल्यामुळे शेतकरी आता पावसाला त्रस्त झाले आहे. शेतीमधील कामे ठप्प झाल्यामुळे यंदाही पीक होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

पावसामुळे पिकांना तणांनी वेढा घातला आहे. त्यामुळे पिकांची वाढ सुद्धा होत नसल्याचे पाहून शेतकरी चिंतेत पडला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीवर खर्च केला, मात्र यंदाही नुकसान होण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. पावसामुळे शेतामधील कामे ठप्प होऊन पिकांची आशा मावळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे, अशी मागणी कुरणखेड परिसरातील शेतकरी करीत आहेत.

गतवर्षी सारखी यंदारी तिच परिस्थिती

गतवर्षी सुद्धा यावेळीच अतिवृष्टीचा तडाखा कुरणखेड परिसराला बसला होता. तुरीचे पीक हाती येणार त्यावेळीही गारपीटचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता, त्यामुळे हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत शासन स्तरावर व विमा कंपनीने सर्वे केले होते, मात्र तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली होती. त्यातही केवळ अतिवृष्टीचीच मदत शासनाकडून मिळाली. तुरीवर झालेल्या गरपीटीची मदत अद्यापही मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.

अतिवृष्टीमुळे विहीर खचली; शेतकरी अडचणीतअतिवृष्टीमुळे विहीर खचली; शेतकरी अडचणीत

वाडेगाव : गत आठवड्यात झालेल्या दमदार पाऊसामुळे शेतातील विहीर खचली असल्याने संबंधित शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

येथील अल्पभूधारक शेतकरी किशोर जयराम अवचार यांची नदीवरील गायरान भागातील गट नंबर १०१७ या बागाईत शेतातील बांधकाम करण्यात आलेली विहीर दमदार पाऊसामुळे पूर्णपणे खचली आहे, त्यामुळे शेतकरी किशोर अवचार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे अवचार यांनी संबंधित विभागाकडे तक्रार देऊन नुकसान झालेल्या विहिरीचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

माझ्या लिंबू बागाईत शेतातील बांधकाम केलेली विहीर दमदार झालेल्या पाऊसामुळे पूर्णपणे खचली आहे, त्याबाबत संबंधित विभागाला लेखी तक्रार दिली आहे.

- किशोर अवचार, नुकसानग्रस्त शेतकरी

कुरणखेड परिसरात पिके अद्यापही पाण्याखाली असून, कोणतीच कामे करता येत नाही आहेत, पाण्यामुळे पिके पिवळी पडत आहेत. त्यामुळे हा परिसर ओला दुष्काळ म्हणून घोषित करण्यात यावा.

- प्रशांत पांडे, माजी पं.स. सदस्य, कुरणखेड

कुरणखेड, कोळंबी परिसरात अद्याप केवळ २८० शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असून, ही संख्या अतिशय कमी आहे. ज्यांचे नुकसान झाले आहेत त्यांनी नुकसान झाल्यापासून ७२ तासात तक्रारी दाखल करावी. पुढील एक दिवसाने विमा कंपनीचा सर्वे सुरू होणार आहे. तसेच, शासनही सर्वे करणार आहे. याची दखल घेण्याचे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.

- सुषमा ठाकरे, पं.स. सदस्य, कुरणखेड.

Web Title: Akola Weather Update Heavy Rain Kunkhed Farmer Crop Damage Agriculture Loss

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top