अकोला : आजपासून दोन दिवस पाऊस!

दोन दिवसानंतर पुन्हा विश्रांती; हवामान विभागाचे संकेत
Akola weather update Two days rain
Akola weather update Two days rain sakal

अकोला : एक दिवस पाऊस अन् दोन दिवस दांडी, पावसाचे हे स्वरुप या मोसमाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. आताही २३ व २४ जून रोजी अकोला जिल्ह्यासह विदर्भात जोरदार पावसाचे संकेत व त्यानंतर विश्रांतीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मृगाच्या सुरुवातीपासून म्हणजे ७ किंवा ८ जूनपासून विदर्भात मॉन्सूनच्या सरी कोसळत असतात. परंतु, गेल्या काही वर्षात जवळपास १५ दिवस ते महिनाभर मॉन्सूनचे आगमन लांबले आहे. यावर्षी मात्र, नियमित स्वरुपात म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच जोरदार आगमन व सरासरीच्या १०० टक्के पर्जन्यमानाचे संकेत हवामान विभागाने दिले होते.

मात्र, अजूनपर्यंत जोरदार व नियमित मॉन्सूनची शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असून, एक दिवस पाऊस व दोन दिवस खंड, असे चित्र आठवडाभरात अनुभवाला येत आहे. आता पुढेही दोन दिवस विदर्भात जोरदार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले असून, सोबतच पुन्हा पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता वर्तविली आहे.

...नंतरच पेरणी करा

आठवडाभरात तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना मॉन्सून आगमनाची चाहूल लागली. त्यानुसार काही शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा आटोपली आहे. परंतु, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. १०० मिमी पाऊस पडल्यानंतर किंवा जमिनीला योग्य ओलावा आल्यानंतरच खरीप पेरणी करावी, असे आवाहन कृषी अभ्यासकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com